नाना पटोलेंच्या वक्तव्याने काँग्रेस महानगराध्यक्षपदासाठी वर्चस्वाची लढाई

akola news Nana Patole's statement is a battle for supremacy for the post of Congress leader
akola news Nana Patole's statement is a battle for supremacy for the post of Congress leader
Updated on

अकोला १ ः काँग्रेसमध्ये जिल्हा स्तरावर तरुणांना संधी देण्याचे संकेत गत आठवड्यात मुंबई येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिले होते. त्यानंतर अकोला महानगराध्यक्ष पदासाठी युवकांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. थेट आपल्याच नावाला कशी सर्वाधिक पसंती आहे, हे दर्शविण्यासाठी या युवा नेत्यांकडून गुगल सर्व्हेच्या माध्यमातून थेट ऑनलाईन माेहीमच राबविली जात आहे.


अकोला जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काँग्रेस राजकीय दृष्ट्या खूपच मागे आहे. सन २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तर ५३ जागांपैकी चार उमेदवार विजयी झाले हाेते. विशेष म्हणजे, लोकसभा मतदारसंघात चांगले मतदान घेवूनही काँग्रेसची स्थानिक पातळीवर कुरघोडीच्या राजकारणामुळे माघार होत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस पक्षाच्या या स्थितीबाबत ता. २५ मार्च राेजी मुंबईत आढावा घेण्यात आला हाेता. त्यात काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी युवा पदाधिकाऱ्यांना संधी देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्षांनी दिले होते. यावेळी अकोला जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांची उपस्थिती होती. तीन ते चार तास सर्वांगिण चर्चा झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचनाही प्रदेशाध्यक्षांनी केली होती.
............................
जि.प. व मनपा निवडणुकीत परीक्षा
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा घटक असलेला काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी-पक्ष वाढण्याकरिता जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत मुंबईतील अंर्तगत बैठकीत नेत्यांनी दिले हाेते. सध्या जि.प. व पं.सं.च्या रिक्त झालेल्या ४२ जागांसाठी निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहे. या निवडणुसीसोबतच पुढील वर्षी होणाऱ्या मनपा निवडणुकीत प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातील नवीन पक्ष संघटनेची परीक्षा होणार आहे. त्याचा सराव आतापासूनच सुरू झाला आहे.
.........................
पुन्हा तीच ओढाताण
जिल्ह्यात अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल झालेले नाहीत. फेरबदलासाठी यापूर्वी अनेकदा प्रदेशस्तरावर जिल्ह्यातून मागणीही झाली. मात्र दखल घेण्यात आली नाही. परिणामी संधी मिळत नसल्याने अनेकांनी पक्षालाही साेडचिठ्ठी दिली. आता संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वी ज्या प्रकारे जाती-पातीच्या राजकारणाला हवा देत काँग्रेसमध्ये स्वकियांचेच पाय ओढण्याचे प्रकार झालेत, तेच प्रकार आता पुन्हा मीच कसा पदासाठी लायक आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्नातून दिसून येत आहे. तिच ओढाताण सुरू झाली आहे.
.........
गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे दिले होते संकेत
काँग्रेस हा पक्ष माणून सर्वांनी एकत्रपणे काम करा. गट बाजीला यापुढे थारा नाही. पक्षात गटबाजी करून एकमेकांचे पाय ओढण्याचे प्रकार झाल्यास गटबाजी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, अशा स्पष्ट सूचना प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यात. त्यामुळे आता ऑनलाइन मोहीम राबवून अशा प्रकारे गटबाजी व जातीय राजकारणाला हवा देणाऱ्यांबाबत प्रदेशाध्यक्ष कोणता निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com