पंचायत समितीमध्ये जनावरे बांधण्याचा राष्ट्रवादीचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola news NCPs warning to tie animals in Panchayat Samiti

तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिवरखेड आणि इतर गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठयांचे प्रस्ताव मागील वर्षी मंजूर करण्यात आले होते. परंतु कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे कित्येक निवेदने देऊन सुद्धा सदरील गोठयांचे आदेश काढण्यात आले नाहीत.

पंचायत समितीमध्ये जनावरे बांधण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

हिवरखेड (जि.अकोला) : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिवरखेड आणि इतर गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठयांचे प्रस्ताव मागील वर्षी मंजूर करण्यात आले होते. परंतु कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे कित्येक निवेदने देऊन सुद्धा सदरील गोठयांचे आदेश काढण्यात आले नाहीत.

गट विकास अधिकारी तेल्हारा यांना वेळोवेळी या बाबतीत माहिती उपलब्ध करून देण्यात आली की शेतकरी उधार, उसने पैसे घेऊन गोठयांचे बांधकाम करण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. व हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी  शासनाची मदत आवश्यक आहे.

परंतु त्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष न देता गट विकास अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली व एक वर्ष झाले तरीही सदरील गोठयांचे प्रकरण अजूनही प्रलंबितच आहे. म्हणून शेवटी हे प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून सुटणार नसल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका प्रसिद्धी प्रमुख धनंजय गावंडे, सलमान खान, एजाज शहा इत्यादींनी पंचायत समिती तेल्हारा कार्यालयात निवेदन दिलेले आहे. सविस्तर निवेदन देताना जर दहा दिवसात काही ठोस उपाय पंचायत समिती मार्फत केल्या गेले नाही तर घरी असलेली जनावरे पंचायत समितीमध्ये बांधून आंदोलन करू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी गट विकास अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची राहील असे निवेदन देण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Web Title: Akola News Ncps Warning Tie Animals Panchayat Samiti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top