एका पत्रकारासह मूर्तिजापुरात नऊ पॉझिटिव्ह

प्रा.अविनाश बेलाडकर 
सोमवार, 13 जुलै 2020

मूर्तिजापूर शहरात एका युवा पत्रकारासह आज नऊ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या संपर्कातील 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतरांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला.

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : मूर्तिजापूर शहरात एका युवा पत्रकारासह आज नऊ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या संपर्कातील 12 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतरांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला.

संभाव्य कोरोना रुग्ण शोध मोहिमेंतर्गत नगर पालिका, महसूल व आरोग्य प्रशासनाच्या समन्वयक सहभागातून येथील इंदिरा गांधी नगर परिषद विद्यालयात शनिवारी (ता.11) विशेष शिबीर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनात मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या शिबिरात एकाच दिवशी तब्बल 125 लोकांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी रोशन पुरा व लालसापुरा भागासह जुन्या वस्तीतील एकूण आठ माना येथील एक असे एकूण नऊ कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आले. 116 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन महिला पॉझिटिव्ह आलेल्या रोशनपुरा व लालसपुरा परीसर प्रतिबंधित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

बाधितांच्या संपर्कातील जणांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतरांना होम क्वारंटाईन रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र नेमाडे यांनी दिली.

रोशनपुरा, लालसापुरा व जुनी वस्ती परिसरातील आठ व माना येथील एक असे एकूण नऊ रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यादृष्टीने परिसरात आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहे.
-अभयसिंह मोहिते. एसडीओ, मूर्तिजापूर.

परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच सांभाळली
"दोन कोरोनाबाधीत समोर येणे, ही संभाव्य कोरोना रुग्ण शोध मोहिमे अंतर्गत घेण्यात आलेल्या "विशेष शिबिरा'ची फलश्रुती आहे. अन्यथा हे कोरोनाबाधित अनेकांच्या संपर्कात येऊन संपूर्ण शहर समूह संसर्गाच्या विळख्यात सापडण्याचा व परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा संभव होता. त्यामुळे या शिबिराच्या आयोजनासाठी येथील एसडीओ, मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरे शिबीर उद्या (ता.14) स्टेशन विभागातील जे.बी.न.प.हिंदी विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या प्रमाणात स्व×ब तपासणी करून घेण्याचे आवाहन सजग नागरिकांकडून करण्यात आले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Nine positives in Murtijapur with one journalist