मुंबई-पुण्याला जायचं, नो टेन्शन!, उद्यापासून ही लांब पल्ल्याची  सेवा होणार सुरू

मनोज भिवगडे
Thursday, 17 September 2020

कोरोना संकटात लॉकडाउनमुळे अकोल्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना आता मुंबई-पुण्याला जाण्यासाठी एसटीने शुक्रवार, ता. १८ पासून लांब व मध्यम पल्ल्याची बस सेवा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : कोरोना संकटात लॉकडाउनमुळे अकोल्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना आता मुंबई-पुण्याला जाण्यासाठी एसटीने शुक्रवार, ता. १८ पासून लांब व मध्यम पल्ल्याची बस सेवा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला विभागांतर्गत येणाऱ्या अकोला व वाशीम जिल्ह्यातील बस स्थानकांवर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, चंद्रपूर, पुसद, औरंगाबाद, बीड, नांदेड, पंढरपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

एकूण ९ स्थानकांवरून ५९ बसच्या जाणे व परत येण्याच्या फेऱ्यांचे नियोजन शुक्रवारपासून करण्यात आले आहे. अकोला येथून नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद (सिडको स्थानक) आणि मुंबईकरिता बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनने अकोला व वाशीम जिल्ह्यात अडकून पडलेल्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली आहे. रेल्वेने विशेष गाड्याच मोजक्या मार्गावर सुरू केल्या असून, त्यातही आरक्षित जागांवरच प्रवास करता येणार आहे. अशा परिस्थितीत एसटीची लांब पल्ल्याची सेवा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शिवशाहीसुद्धा सेवेत
अकोला व वाशीम जिल्ह्यातील एकूण नऊ स्थानकांपैकी अकोला, अकोट, वाशीम स्थानकावरून शिवशाहीच्या फेऱ्याही सुरू करण्यात येणार आहे. एकूण १३ शिवशाही बस नागपूर, मुंबई, पिंपरी चिंचवड करिता सोडण्यात येणार आहे. याशिवाय जदल बसही धावणार आहेत.

बस स्थानक निहाय फेऱ्यांचे नियोजन
अकोला १ (जुने बस स्थानक) ः ८
अकोला २ (नवीन बस स्थानक) ः ९
अकोट ः ४
तेल्हारा ः ६
मूर्तिजापूर ः ४
कारंजा ः ५
मंगरुळपीर ः ५
वाशीम ः ८
रिसोड ः १०

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: No need to go to Mumbai-Pune, no tension !, this long range service will start from tomorrow