esakal | अरे देवा ! एकरभर शेतात किलोभरही नाही उत्पादन, कीड व अतिवृष्टीचा फटका; शेतकऱ्यांंचे आर्थिक गणित बिघडणार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Not even a kilogram of produce in an acre of land, pests and excessive rains

जिल्ह्यात मूग उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे झाले आहे. आधी कीड व नंतर अतिवृष्टीने मुगाचे उत्पादन घटले आहे. तेल्हारा तालुक्यात मुगाचे उंबरठा उत्पादन एकरी ८०० ग्रॅम आल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

अरे देवा ! एकरभर शेतात किलोभरही नाही उत्पादन, कीड व अतिवृष्टीचा फटका; शेतकऱ्यांंचे आर्थिक गणित बिघडणार

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : जिल्ह्यात मूग उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे झाले आहे. आधी कीड व नंतर अतिवृष्टीने मुगाचे उत्पादन घटले आहे. तेल्हारा तालुक्यात मुगाचे उंबरठा उत्पादन एकरी ८०० ग्रॅम आल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.


तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या तळेगाव खुर्द येथे कृषी विभागांंतर्गत पिकाचा उत्पन्नाचा अंदाज घेण्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग घेण्यात आला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कृषी विभागांचे अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पीक उत्पन्ना अंदाज घेण्याकरिता पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. त्यात पीक कापणी प्रयोगासाठी शेतावर प्रत्यक्ष जाऊन कापणी करण्यात आली.

श्रीधर मगर व पंचशीला रतन हिवराळे यांच्या शेतात मूग पिकाची कापणी करण्यात आली. यावेळी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व शेतकरी प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी व कृषी सहाय्यक हजर होते. पीक कापणी प्रयोगातून आलेले


एकरी उत्पनानुसार ८०० ते एक हजार ग्रॅम आहे. मूग, उडीद उत्पादक शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला असल्याचे हे चित्र आहे.

कीड व अतिवृष्टीचा फटका
मूग, व उडीत हे नगदी पीक म्हणून बघितल्या जाते. खरीपात लवकर हाती पैसा यावा म्हणून शेतकरी हे पीक घेण्याचा धोका गत काही वर्षांपासून पत्करत आले आहे. यावर्षी मॉन्सून वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मूग पिकाला पसंती दिली. कमी कालावधित काहीतरी उत्पन्न होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्ष पीक पाहणी दरम्यान मूग पिकाचे उत्पन्न बुडाल्याचे आढळून आले. मूग पिकावर यावर्षी अज्ञान रोगाचा हल्ला झाला होता. त्यातच आत पीक काढणीला आले असताना संततधार पावसाने शेतातच झाडावर मुगाच्या शेंगांना कोंब फुटलले होते. त्यामुळे उत्पादनात मोठे घट झाली आहे.

उत्पादन खर्चही निघणार नाही
पीक कापणी प्रयोगातून उंबरठा उत्पादन ठरविले जाते. जिल्ह्यात सुरू झालेल्या पीक कापणी प्रयोगातून यावर्षी मूगाचे पीक एकरी ८०० ते १००० ग्रॅमच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, उडीद पीक घेण्यासाठी केलेला खर्चही निघणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शिवाय गेले तीन महिने केलेले परिश्रमही वाया गेले आहे.

जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवर मूग
अकोला जिल्ह्यात मॉन्सून वेळेवर सुरू झाल्याने यावर्षी २२ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी मुगाची पेरणी केली आहे. या पिकाकडून शेतकऱ्यांना मोठ्‍या अपेक्षा होत्या. मात्र उत्पन्नाची हमीच राहली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विम्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, अशी अपेक्षा केली जात आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top