आता सात दिवस जनता कर्फ्यू, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बैठक

Akola News: Now seven days public curfew, meeting on the backdrop of Corona crisis
Akola News: Now seven days public curfew, meeting on the backdrop of Corona crisis

वाशीम  :  शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण विक्रमी संख्येने वाढत असून, मृत्युसंख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त आणि चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत जनतेतून उर्स्फुतपणे जनता कर्फ्यु राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

त्यामुळे शहरात कोरोना समूह संसर्गाला अटकाव होण्याच्या दृष्टिकोनातून निर्णायक पावले उचलण्यासाठी व्यापारी मंडळ आणि व्यापारी युवा मंडळासह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक ता. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता महेश भवन येथे पार पडली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या बैठकीत बुधवार, ता.१६ ते २२ सप्टेंबरपर्यत सात दिवस दवाखाने, हॉस्पिटल, मेडीकल व दूध विक्री आणि संकलन ही सेवा वगळता वाशीम शहरामध्ये उस्फुर्तपणे जनता कर्फ्यू राबविण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.

अत्यावश्यक सेवेमध्ये दूध विक्री आणि संकलनाची वेळ सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ अशी राहणार आहे.   या बैठकीला व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव मनिष मंत्री, व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, सचिव भरत चंदनानी, प्रवक्ता गोविंद वर्मा, माजी नगराध्यक्ष राजू राठी, हरीश सारडा, माजी नगराध्यक्ष सुरेश लोध, विवेक पाटणी, बॉबी गुलाटी, सुभाष उखळकर, शैलेश दुरतकर, नितीन विसपुते, श्याम नेनवाणी, बबलुभाई, मुशीरभाई, रामदास चांदवाणी, आशिष ठाकूर, बबलुभाई राठी, नंदकिशोर पाटील, वसंता परळकर, राजू अग्रवाल, पप्पू नेनवाणी आदीसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि व्यापारी बांधवांची उपस्थिती होती.

या बैठकीत शहरात अनलॉक ४ नंतर सुरू झालेला कोरोनाचा समूह संसर्ग आणि रोज विक्रमी संख्येने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीवर चिंता व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी आणि त्यांच्या जिविताच्या रक्षणासाठी व्यापारी बांधवांच्या वतीने कमीत कमी सात दिवस जनता कर्फ्युचा निर्णय घेवून या सात दिवसात शहरातील संपूर्ण बाजारपेठ, लहानमोठी दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शहरवासीयांच्या जिविताच्या रक्षणासाठी लहानमोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी सात दिवस आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे.
- गोविंद वर्मा, प्रवक्ता, व्यापारी युवा मंडळ

नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज
 शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे शासन, प्रशासन, आरोग्य विभागासह अन्य घटक या संकटाशी अहोरात्र झटत आहेत. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यासंह सर्वसामान्य नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे. या कोरोना संकटाला हद्दपार करण्यासाठी वाशीम शहरवासीयांच्या सहकार्याची आवश्यकता असून, व्यापारी मंडळ व व्यापारी युवा मंडळाने घेतलेल्या या जनता कर्फ्युला शहरातील सर्व लहानमोठ्या व्यापारी बांधव, दुकानदार व आम जनतेने सहकार्य करून आपआपली प्रतिष्ठाने १६ ते २२ सप्टेंबरपर्यत संपूर्णपणे बंद ठेवावी.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com