esakal | आता मुंबई ते पुरी, हावडा दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Now special trains between Mumbai and Puri, Howrah

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते पुरी व हावडा दरम्यान अतिरिक्त विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबा मिळल्याने त्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना होईल.

आता मुंबई ते पुरी, हावडा दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते पुरी व हावडा दरम्यान अतिरिक्त विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर गाड्यांना अकोला रेल्वे स्थानकावर थांबा मिळल्याने त्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना होईल.

लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक ०२१४५ डाऊन ११ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २०.३५ वाजता सुटेल व पुरी येथे तिसऱ्या दिवशी ०६.५५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०२१४६ अप विशेष १३ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रत्येक मंगळवारी पुरी येथून २१.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, महासमुंद, खारियार रोड, कांताबंजी, टिटलागड, बालांगीर, बारगाह रोड, संबलपूर, अंगुल, तालचेर, ढेंकनाल, कटक, भुवनेश्वर आणि खुर्दा रोड या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

दुसरी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक विशेष गाडी पुढील सूचना मिळेपर्यंत धावेल. त्याअंतर्गत गाडी क्रमांक ०१०५१ डाऊन विशेष ८ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार आणि गुरुवारी २०.३५ वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०५२ अप विशेष १० एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवार व शनिवारी हावडा येथून २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०५.३० वाजता पोहोचेल.

या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, राजनंदगाव, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, पुरुलिया, आद्रा, बांकुरा, मिदनापूर, खडगपूर आणि संत्रागाची या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ०२१४५ आणि ०१०५१ या पूर्णतः राखीव विशेष गाडीचे विशेष शुल्कासह आरक्षण ४ एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि आरआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image