esakal | स्वयंम अर्थसाहाय्यिक शिक्षकांवर ऑनलाईन शिक्षणामुळे आली उपासमारीची पाळी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Online education has led to a time of starvation for teachers

मागील सात महिण्यापासुन कोरोणा विषाणू संदर्भात प्रशासनाने लाॅकडाऊन जारी केला आहे.यामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता येत आसली तरी सुध्दा सर्व शाळा बंद तर ऑनलाईन क्लास घेण्याला मुभा देण्यात आली.परंतु ज्या शिक्षण संस्था मध्ये अनेक शिक्षक,प्राध्यापक तासीकावर ज्ञानार्जनाचे धडे देत होते.त्यांना अनेक संस्थानी वा-यावर सोडल्याने सदर शिक्षक,प्राध्यापकांवर उपास मारीची पाळी आली आहे.

स्वयंम अर्थसाहाय्यिक शिक्षकांवर ऑनलाईन शिक्षणामुळे आली उपासमारीची पाळी

sakal_logo
By
पी.डी. पाटील

रिसोड (जि.वाशीम) :  मागील सात महिन्यांपासून कोरोना विषाणू संदर्भात प्रशासनाने लाॅकडाऊन जारी केला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता येत आसली तरी सुध्दा सर्व शाळा बंद तर ऑनलाईन क्लास घेण्याला मुभा देण्यात आली .परंतु ज्या शिक्षण संस्था मध्ये अनेक शिक्षक, प्राध्यापक तासीकावर ज्ञानार्जनाचे धडे देत होते. त्यांना अनेक संस्थानी वाऱ्यावर सोडल्याने सदर शिक्षक,प्राध्यापकांवर उपास मारीची पाळी आली आहे.


तालुक्यातील अनेक संस्थांनी वर्ग अकरावी, बारावी करीता विविध शिक्षणासह,व्यवसायीक शिक्षणाचे वर्गांना प्रारंभ केला. विशेष म्हणजे शासणाद्वारे स्वयंमअर्थसाहाय्य अंतर्गत सदर वर्गांना प्रारंभ केल्याने बहुतांश शाळा,कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक शिक्षक हे तासीकांवर शिकवित होते.

तर एकच शिक्षक सकाळ-दुपारच्या वेगवेगळ्या वेळामध्ये शिक्षणाच्या तासीका घेत होते.परंतु शाळा बंदीला लाॅकडाऊन चा आडसर आला आणि तासीका घेणा-या शेकडो शिक्षकांवर उपास मारीची वेळ आली.

आधीच शिक्षक भरती बंद आसल्याने अनेक शिक्षकांनी कुटुंबातील सदस्यांच्या उदरनिर्वाहासाठी अनेक शाळा महाविद्यालयामध्ये तासीकांवर शिक्षणाला प्रारंभ केला होता.परंतु लाॅकडाऊनने तासीका घेणा-या शिक्षकावर उपास मारीची पाळी आणली आहे.

तर ज्या शिक्षण संस्थांमधील अनेक कला-विज्ञान-काॅमर्स ची धुरा या तासीका शिक्षकांवर होती.त्यांनी सुध्दा सदर शिक्षकांना वा-यावर सोडले आहे.आशा विचित्र पध्दतीने तासीका घेणा-या शेकडी शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे.तर दुसरी कडे अनेक खाजगी शिक्षण संस्था ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह,पालकांची मोठी आर्थिक लुट करीत आसल्याचे तक्रार तासीका शिक्षकाद्वारे केल्या जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)