डॉक्टर नसल्याने जखमी रुग्णास सहन कराव्या लागल्या वेदना

akola news The pain that the injured patient had to endure because there was no doctor
akola news The pain that the injured patient had to endure because there was no doctor
Updated on

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : दुचाकी अपघातात जखमी झालेल्या रुग्णास देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने तब्बल दोन तास वेदना सहन कराव्या लागल्याची घटना रविवारी (ता. 21) सायंकाळी घडली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टरांशी संपर्क केला असता ड्युटी शेड्यूलच्या नावाने डॉक्टरांनी रुग्णालयात येण्यास टाळाटाळ केली. दोन तासानंतर आरोग्य सेविका व शिपाई यांनी कच्चे प्लॅस्टर करून जालना येथे हलविले.

दरम्यान कोरोना काळात जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयात सोयीसुविधा, रँमडीसीवर इंजेक्शन तसेच औषधींचा साठा उपलब्ध करून देण्याविषयी दक्ष असलेले पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघात शासकीय  रुग्णालयातील डॉक्टर्स कर्तव्यात कसूर करत असल्याच्या अनेक घटना अलीकडील काळात घडल्या आहे.


तालुक्यातील अंढेरा येथील गजानन प्रताप विणकर यांच्या दुचाकीला रविवारी सायंकाळी अपघात झाला. यात त्यांच्या पायाला जबर मार लागला जखमी अवस्थेत त्यांच्या पत्नी व नातेवाईकांनी प्रथम उपचारासाठी देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालय येथे आणले. दवाखान्यात एकही डॉक्टर हजर नसल्याचे सांगण्यात आले. पायाला जबर दुखापत झाल्याने अपघात ग्रस्त श्री विणकर होणार्‍या वेदनांनी त्रस्त होते.

अशावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास राऊत भानाभाऊ काकडे, शेख अन्वर, शरद काळे, नागेश शिंगणे आदींनी आरोग्य अधिकारी विशाल सोळंकी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून रुग्णालयात डॉक्टर गैरहजर आहे अपघातातील जखमी रुग्णालयात सह इतर रुग्ण ताटकळत बसले आहे ड्युटी असलेल्या डॉक्टर अथवा पर्यायी डॉक्टरांना दवाखान्यात पाठवा अशी विनंती केली. रुग्णालयात नियुक्त असलेल्या इतर डॉक्टरांशी संपर्क साधला मात्र रुग्णांसाठी देवाचे दूत समजल्या जाणार्‍या एकही डॉक्टर रुग्णालयाकडे फिरकले नाही. शेवटी आरोग्य सेविका मनीषा सानप व शिपाई मनोज खिल्लारे यांनी प्रथमोपचार करून कच्चे प्लास्टर केले मात्र पाय फॅक्चर असलेल्या रुग्णास दोन तास वेदना सहन कराव्या लागल्या. रात्री उशिरा गंभीर जखमी अवस्थेत गजानन विनकर यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात ड्युटी असलेल्या आरोग्य अधिकारी नेहमीच गैरहजर असल्याच्या तक्रारी असून परिसरातील गरजू रुग्णांच्या आरोग्य विषयक सेवा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अभावी रुग्णालय वार्‍यावर सोडल्या जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे  संपूर्ण कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र त्यांचा मतदारसंघ असलेल्या तालुक्यातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे कोरोना काळातील रुग्णांची गैरसोय होत आहे.

ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नसल्याने अपघातातील जखमी साठी धावून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रथम डॉक्टरांची संपर्क साधून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. असंवेदनशील असलेल्या आरोग्य अधिकार्‍यां कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अपघातातील जखमी रुग्णाची अवस्था तसेच डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्‍यांची अनुपस्थिती दर्शविणारी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. सदर क्लिप पाहून समाजमनातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

कोरोना काळात ग्रामीण भागातील रुग्ण संख्या वाढत आहे आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी याची जाणीव ठेवून जबाबदारीने काम करावे आहे गैरहजर असणार्‍या जबाबदार डॉक्टर विरुद्ध वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करावी
-लक्ष्मी रामकिसन म्हस्के,  सरपंच देऊळगाव मही

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com