रुग्णालयानेच घेतला रुग्णाचा जीव, काय आहे प्रकार?

विवेक मेतकर
Thursday, 17 September 2020

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड19 च्या रुग्णांबाबत गंभीर स्वरूपाचे निष्काळजीपणा होत आहे. डॉक्टरच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

अकोला  : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड19 च्या रुग्णांबाबत गंभीर स्वरूपाचे निष्काळजीपणा होत आहे. डॉक्टरच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्ण नसतांनाही पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून दाखल करणे, रुग्णाचा तपासणी अहवाल यायच्या अगोदरच रुग्णाला कोविड रुग्ण म्हणून  दुय्यम  वागणूक देणे, रुग्णाला वाचवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असतांनाही  रुग्णांबाबत नातेवाईक यांना माहिती दिली जात नसल्याने रुग्णांना जाणीवपूर्वक यमसदनी पाठवले जात आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

असे अनेक गंभीर आरोप  मृतक किशोर तुळशीराम शिंदे यांची भाची शिवानी किटे व नातेवाईकांनी केला आहे. सर्वोपचार रुग्णालयाच्या ढिसाळ व मनमानी कारभाराची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. याकरिता आज 17 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदचे आयोजन  करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news: Patients life taken by general hospital