esakal | विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ, ९ जणांविरुद्ध पोलिसात तक्रार

बोलून बातमी शोधा

akola news Physical and mental harassment of married woman, complaint lodged with police against 9 persons

पिंजर पोलिस स्टेशनंतर्गत असलेल्या मोरगाव काकड येथील स्वप्निल शुभाष काकड व इतर ९ जणांनी पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केला असून पतीने अनेकदा इच्छे विरुद्ध शारीरिक संंबंध ठेवले असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. टिटवा माहेर आणि मोरगाव काकड सासर असलेल्या २८ वर्षीय पिडीत महिलेने शुक्रवारी (ता. ९) नऊ जणांविरुद्ध पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली.

विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ, ९ जणांविरुद्ध पोलिसात तक्रार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

पिंजर (जि.अकोला) ः पिंजर पोलिस स्टेशनंतर्गत असलेल्या मोरगाव काकड येथील स्वप्निल शुभाष काकड व इतर ९ जणांनी पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ केला असून पतीने अनेकदा इच्छे विरुद्ध शारीरिक संंबंध ठेवले असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. टिटवा माहेर आणि मोरगाव काकड सासर असलेल्या २८ वर्षीय पिडीत महिलेने शुक्रवारी (ता. ९) नऊ जणांविरुद्ध पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवा येथील महिलेचे १६ एप्रिल २०१६ रोजी मोरगाव काकड येथील स्वप्नील सुभाष काकड यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिली नंतर मात्र पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ सासरच्यांनी केली.

वडिलांकडून पैसे आणण्याची तगादा लावण्यात आला व क्षुल्लक कारणावरून वाद करणे, पीडित महिलेला वाईट भाषेत शिवीगाळ करणे, धमक्या देणे, जबरदस्तीने इच्छे विरुद्ध शारिरीक संबंध ठेवणे, अनैसर्गिक कृत्याची मागणी करणे इत्यादी त्रासाला पीडित महिला कंटाळून गेली होती.

त्यामुळे कंटाळलेल्या विवाहितेने पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यात स्वप्नील सुभाष काकड पती, सुभाष जगलाजी काकड सासरे, प्रकाश काकड चुलत सासरे, नागेश दामोदर काकड जेठ, सत्यभामा ठाकरे, मालू काकड (सर्व रा. मोरगाव काकड, ह.मु. रचना कॉलनी, गोरक्षण रोड अकोला) आणि अमरावती इनव्हर्स सिटी येथील पंकज बबन पकान, रश्मी पंकज पकान व सृष्टी प्रकाश काकड (रा. मोरगाव काकड) यांच्या विरुद्ध पिंजर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)