दोन वाहतून पोलिसांनी घेतली 50 रुपयांची लाच, अॅन्टी करप्शनच्या पथकाने रचला सापळा, मग पहा काय झाले

अरूण जैन 
Tuesday, 8 September 2020

जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून बुलडाणा वाहतूक शाखेतील दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना ५० रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अकोला पथकाने रंगेहात पकडले आहे.

बुलडाणा  : जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून बुलडाणा वाहतूक शाखेतील दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना ५० रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अकोला पथकाने रंगेहात पकडले आहे.

मलकापूर येथील दिनेश आस्टकर उर्फ मुन्ना राठोड हे मलकापूर ते बुलडाणा येथून विविध वाहनावर जनावरे घेवून येत असतात. ही वाहतूक करीत असताना त्यांना वाहतूक शाखेतील पोलिस वारंवार लाच देऊन पैश्याची मागणी करीत होते. या मागणीस कंटाळून याप्रकरणी वाहन चालकाने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या तक्रारीवरून अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुलडाणा मलकापूर रोडवरील चौधरी गॅस पंपाजवळ सापळा रचला. यावेळी जनावरांची वाहतुक करणाऱ्या माल वाहक चालकाने वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी सुरेश कचरे, विशाल वारडेकर यांना ५० रुपयांची लाच दिली.

याच वेळी अकोला पथकाने रचलेल्या सापळ्यातून वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी अडकले. ही घटना आज सोमवारी (ता. ७) रोजी दुपारी ३.३० वाजता बुलडाणा- मलकापूर रोडवरील चौधरी गॅस पेट्रोल पंपाजवळ घडली. सदर कारवाई करण्यापूर्वी प्राप्त तक्रारीवरून अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ता. २५ ऑगस्ट रोजी बुलडाण्याकडे जनावर येणाऱ्या वाहनात बसून शासकीय पंच बसवून पडताळणी केली होती.

त्यावेळी पैसे नसल्याचे सांगून दुसऱ्या फेरीत आणून देतो असे चालक आस्टकर यांनी संगितले. अकोला एसीबीच्या पथकाने आज रोजी सदर कारवाई केली. कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी वाहतूक शाखेच्या दोनही पोलिस कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Police take bribe of Rs 50 from two vehicles, anti-corruption team sets a trap