esakal | प्रकाश आंबेडकरांचा प्रवास बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला छेद देणारा ! - प्रा. मुकुंद खैरे
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Prakash Ambedkar's journey pierces Babasaheb's Dhamma Revolution!

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच राजेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले केले , व त्यानंतर आज पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे , त्याप्रमाणे मायावतींनी सुद्धा परशुरामचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे , यावरून मायावती आणि प्रकाश आंबेडकर या दोघांचाही राजकीय प्रवास हा बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला छेद देणारा असल्याचा हल्लाबोल मुकुंद खैरे यांनी पत्रपरिषदेत केला

प्रकाश आंबेडकरांचा प्रवास बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला छेद देणारा ! - प्रा. मुकुंद खैरे

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच राजेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले केले , व त्यानंतर आज पंढरपूर येथील विठ्ठलाचे मंदिर खुले करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे , त्याप्रमाणे मायावतींनी सुद्धा परशुरामचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे , यावरून मायावती आणि प्रकाश आंबेडकर या दोघांचाही राजकीय प्रवास हा बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला छेद देणारा असल्याचा हल्लाबोल मुकुंद खैरे यांनी पत्रपरिषदेत केला .

पुढे बोलताना ते म्हणाले की , मायावती आणि प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांनि 14 ऑक्टोबर 1956 रोजी घडवून आणलेल्या ऐतिहासिक धम्म क्रांती वेळेस दिलेल्या बावीस प्रतिज्ञा चे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे , त्यासोबतच राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला दोघेही  तिलांजली देत असल्याच्या आरोप सुद्धा केला .

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आज भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी मंदिर उघडा म्हणून आंदोलन करत आहे , त्यावरून प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांची यांची राजकीय वाटचाल भाजपाच्या हिंदुत्वाकडे जात असल्याने विशेषतः बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणाऱ्या बौद्ध जनतेनी या नेत्यापासून सावध होण्याचा सल्ला ही पत्र परिषदेतून दिला.

 मुंबईला काढणार आरक्षण बचाव महामोर्चा
 राज्यघटनेच्या अनुच्छेद १६ नुसार मागासवर्गीयांचा मूलभूत अधिकार नाही असा युक्तिवाद भाजपा सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला होता, युक्तिवाद मान्य करीत सुप्रीम कोर्टाने ८ फेब्रुवारी 2020 आरक्षण मागासवर्गीयांचा हक्क नाही असा  ऐतिहासिक निर्णय दिला . त्यामुळे आरक्षणाला एक प्रकारे धोका निर्माण झाला असून त्याची गंभीर दखल घेत एस्सी, एसटी, ओबीसी, मराठा तसेच मुस्लीम समाजाला राज्यघटनेच्या अनुच्छेद 46 नुसार आरक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी समाज क्रांती आघाडी डिसेंबर महिन्यापर्यंत मुंबईला आरक्षण बचाव महामोर्चा काढणार असल्याचेही घोषणा प्रा. मुकुंद खैरे यांनी पत्रकार परिषदेत केली.