esakal | एमपीएससी पूर्व परीक्षा ३३ उपकेंद्रांवर रविवारी, सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Preventive order on MPSC pre-examination 33 sub-centers on Sunday, from 6 am to 8 pm

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.

एमपीएससी पूर्व परीक्षा ३३ उपकेंद्रांवर रविवारी, सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः  एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम सेवा संयुक्‍त (पूर्व) परीक्षा - २०२० चे रविवार, ता. ११ रोजी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी अकोला शहरातील एकूण ३३ उपकेंद्रावर सकाळी ११ वाजेपासून होणार आहे.

हेही वाचा - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होवू नये, तसेच कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये याकरिता सर्व ३३ परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात रविवार, ता.११ रोजी सकाळी सहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image