
महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभाेजन थाळीसाठी गरजूंना येत्या १ एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये माेजावे लागणार आहेत. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने हा दर १० रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला होता.
शिवभाेजन थाळीची किंमत पुन्हा १० रुपये, उद्यापासून माेजावे लागणार जादा पैसे
अकोला : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभाेजन थाळीसाठी गरजूंना येत्या १ एप्रिलपासून पुन्हा दहा रुपये माेजावे लागणार आहेत. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने हा दर १० रुपयांवरून पाच रुपये करण्यात आला होता.
गरीब व गरजूंसाठी शिवभोजन योजनेअंतर्गत १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गतवर्षी घेतला होता. प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याच्या मुख्यालयी ही योजना राबवण्यात आली. त्याअंतर्गत महापालिका क्षेत्रात दोन ठिकाणी थाळी केंद्र सुरू करण्यात आली.
त्यानंतर याेजनेची व्याप्ती वाढवत ग्रामीण भागातही केंद्र सुरू करण्यात आली. गतवर्षी मार्चमध्ये काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कडक टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मजूर, स्थलांतरित, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची साेय व्हावी, यासाठी शिवभाेजन थाळीची किंमत १० रुपयांवरून पाच रुपये करण्यात आली. हा निर्णय सुरुवातीला ३० मार्च २०२० पासून पुढील तीन महिन्यांसाठी घेण्यात आला. नंतर याच निर्णयाला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. ही मुदत ३१ मार्च २०२० राेजी संपुष्टात येणार असल्याने १ एप्रिल २०२१ पासून थाळीची किंमत पूर्वीप्रमाणेच १० रुपये राहिल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आहे.
......................
अकोला जिल्ह्यातीलतालुकानिहाय केंद्र
तालुका केंद्रांची संख्या
अकाेला ०३
मूर्तिजापूर ०२
बार्शीटाकळी ०३
तेल्हारा ०२
बाळापूर ०१
अकाेट ०१
पातूर ०१
(संपादन - विवेक मेतकर)
Web Title: Akola News Price Shivbhajan Plate Again Rs 10 Extra Money Will Have Be Paid Tomorrow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..