esakal | पावसाचा इशारा अन् थंडीची लाट, विदर्भात दाटले ढग; तूर उत्पादकांची चिंता वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Rains, cold wave, thick clouds in Vidarbha; Concerns of tire growers increased

जिल्ह्यासह विदर्भात सध्या वातावरण ढगाळले असून, पावसाचे वेध वर्तविण्यात आले आहेत. सोबतच गारवा सुद्धा वाढत असून, दोन ते तीन दिवसात थंडीच्या लाटेची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

पावसाचा इशारा अन् थंडीची लाट, विदर्भात दाटले ढग; तूर उत्पादकांची चिंता वाढली

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला ः जिल्ह्यासह विदर्भात सध्या वातावरण ढगाळले असून, पावसाचे वेध वर्तविण्यात आले आहेत. सोबतच गारवा सुद्धा वाढत असून, दोन ते तीन दिवसात थंडीच्या लाटेची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

वातावरणातील या बदलाचा सर्वाधिक परिणाम पिकांवर होणार असून, किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने तूर उत्पादक चिंतेत पडले आहेत.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

दिवसेंदिवस होत असलेल्या हवामानातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यासोबतच पिकांवर प्रामुख्याने झाल्याचे दिसून येत आहे. हवामानातील बदलामुळे ऋतूचक्र विस्कळीत होऊन मॉन्सूनचे आगमन लांबले. त्यामुळे खरिप व रब्बी पेरणीसुद्धा लांबत गेली. यावेळी सुद्धा मॉन्सूनच्या उशिरा आगमनामुळे खरिपाची पेरणी लांबली.

हेही वाचा - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

त्यानंतरही वातावरणात वेळोवेळी बदल होत गेल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढत गेला अन् मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन, मका, कपाशी इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सध्या तुरीचे पीक चांगले बहरले असून, काही ठिकाणी शेंगा सुद्धा धरल्या आहेत. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून तामिळनाडू आणि पॉण्डेचेरी, आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धुमाकुळ घालत असलेले ‘निवार’ वादळ (लँडफॉल) जमिनीवर दाखल झाले. त्याचा परिणाम महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भातही दिसून येत असून, दोन दिवस पावसाची व त्यानंतर थंडी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

हेही वाचा - बँक कर्मचाऱ्यांनी केले निदर्शने; सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात संप

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर येऊन निवार वादळाचा वेग मंदावला आहे. उपग्रह छायाचित्रानुसार, जमिनीपासून साधारण ३-४ किलोमीटर अंतरावर, उत्तरेकडून येणारे गार बाष्प युक्त वारे, ढग निर्मितीला सहायक ठरत आहेत. परिणाम संपूर्ण उत्तर-पूर्वी राज्य, पूर्व-उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पूर्व-मध्य प्रदेश, विदर्भ, पूर्व मराठवाडा, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक इत्यादी राज्यात आकाश ढगाळलेले आहे. उत्तर गोलार्धात आणि उत्तरेकडील राज्यात होत असलेली बर्फ वृष्टी, सोबत वाढत असलेला थंडीचा जोर, यामुळे राज्यामध्ये गार वारे दाखल होवू शकतात. काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, ही परिस्थिती पुढील २-३ दिवस कायम राहू शकते.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

(संपादन - विवेक मेतकर)

loading image