धक्कादायक! बारावीच्या निकालात मनासारखे मिळाले नाहीत गुण, इंग्रजीच्या भितीने विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

अरूण जैन 
Saturday, 18 July 2020

चिखली तालुक्‍यातील कव्हळा येथील एका बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विदयाथ्यांने इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विनायक संतोष लांडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

बुलडाणा  : चिखली तालुक्‍यातील कव्हळा येथील एका बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विदयाथ्यांने इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विनायक संतोष लांडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

कालच बारावीचा निकाल जाहीर झाला येथील सहकार विद्या मंदिर मध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला 80 टक्के गुण मिळाले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अमडापुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कव्हळा येथील विनायक संतोष लांडे (वय 18) याचे प्रेत आज ( ता. 17 ) सकाळी 5 वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याचे सांगितले जात आहे. 80 टक्के गुण प्राप्त झाले असतांनाही इंग्रजीतील कमी गुणामुळे त्याने नैराश्‍यातून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या बाबत गजानन कुंडलिक लांडे (रा. कव्हळा) यांनी अमडापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली की, विनायकचा नुकताच 12 वी परिक्षेचा निकाल लागला. यामध्ये त्याला एका विषयामध्ये गुण कमी मिळाल्याने त्याने नैराश्‍यातुन सकाळी 6 वाजेला खामखेड़ शिवारातील स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाड़ाला दोरी च्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अमडापुर पोलिसांनी आकास्मित मृत्युची नोंद घेऊन पुढील तपास ठाणेदार अमित वानखेड़े यांच्या मार्गदर्शना खाली ए. एस. आय लक्ष्मण टेकाळे, विनोद वैद्य हे करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news The results of class XII did not get the desired marks, the student's extreme step due to fear of English