शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर, चार हजारावर परीक्षार्थींनी दिली होती परीक्षा

मनोज भिवगडे
Thursday, 6 August 2020

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत १९ जानेवारी २०२० रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल महाटीईटी.इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अकोला  ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत १९ जानेवारी २०२० रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल महाटीईटी.इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महानगरातील १२ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली होती. दोन सत्रात झालेल्या परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी जिल्ह्यातून ४ हजार ६८१ तर दुसऱ्या पेपरसाठी ३ हजार ४२५ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

परीक्षेच्या निकालाबाबत (पात्रतेसाठी) आरक्षण प्रवर्ग, वैकल्पीक विषय, अपंगत्वाचा लाभ मिळाला नसल्यास १५  ऑगस्टपर्यंत पुराव्यासह उमेदवारांच्या लॉगीनमधून ऑनलाईनरित्या तक्रार, आक्षेप नोंदवता येतील.

ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीनुसार निकाल तयार करण्यात आलेला असून त्यात तफावत आढळून आल्यास त्याबाबत परिषदेकडून विचार केला जाईल, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कडून प्राप्त करुन घेता येतील.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola news The results of the Teacher Eligibility Test were announced, with over four thousand candidates appearing for the exam