दूध उत्पादकांच्या गावाचा रस्ता झाला अरुंद, नऊ टॅक्टर, ५० मोटारसायकल; गावात रोजच भानगडी

विवेक मेतकर
Friday, 28 August 2020

दूध उत्पादकांचे गाव म्हणून मौजे लोणी ओळखल्या जाते. या गावातील नागरिकांना सध्या अरुंद रस्तांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमणाचा विळखा गावातील दोन्ही रस्त्यांना बसला असल्याने लोणीसह खरप खुर्द व कळंबेश्वर गावाकडे जाणारे रस्तेही अडविल्या गेले आहेत.

अकोला :  दूध उत्पादकांचे गाव म्हणून मौजे लोणी ओळखल्या जाते. या गावातील नागरिकांना सध्या अरुंद रस्तांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमणाचा विळखा गावातील दोन्ही रस्त्यांना बसला असल्याने लोणीसह खरप खुर्द व कळंबेश्वर गावाकडे जाणारे रस्तेही अडविल्या गेले आहेत.

लोणी हे अकोला शहराला लागून असलेले छोटेशे गाव. गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आणि दूध उत्पादन आहे. गावात नऊ टॅक्टरर, दोन माल वाहक वाहने, ५० मोटारसायकली आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या मोटारसायकली बहुतांश दूध कॅनांसाठी वापरतात. याशिवाय ५०० म्हशी व ६०० गाई-बकऱ्या इतर जनावरे आहेत. गावात ये-जा करण्यासाठी दोनच रस्ते आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर दिवसभर वरदळ राहते.

अरुंद रस्त्यांमुळे वाहनधारक, जनावर मालकांचे रोजचेच वाद. त्यामुळे प्रकरणे पोलिस स्टेशन व कोर्टापर्यंत गेले आहे. परिणामी गावात वाद निर्माण होऊन सलोखा संपत आहे. काही लोकांनी तर ४० वर्षांपूर्वी महावितरणतर्फे बसविण्यात आलेले विद्युत खांबही घरात घेतले.

त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असेच एकच प्रकरण ता. ३ ऑगस्ट २०२० रोजी वाहनाने दोन पिल्ले जखमी झाल्याने वाद उद्भवला. जखमी पिल्लांची नुकसान भरपाई देण्याची तयारी असूनही प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले व गुन्हा दाखल झाले.

हे सर्व प्रकार केवळ रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात गेल्यामुळे घडत असल्याचा दावा लोणीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

खरप खुर्द-लोणी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि इतर अधिकाऱ्यांनी लक्ष देवून अतिक्रमणाचा प्रश्न कायम निकाली काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News The road to the village of milk producers became narrow