डोळ्यात मिरची पावडर टाकून लाख रुपये लुटले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

डोळ्यात मिरची पावडर टाकून अंदाजे एक लाख रुपयांचा येवज लुटल्याची घटना रविवारी (ता. १५) रात्री घडली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पिंजर (जि.अकोला)   ः डोळ्यात मिरची पावडर टाकून अंदाजे एक लाख रुपयांचा येवज लुटल्याची घटना रविवारी (ता. १५) रात्री घडली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

प्राप्त माहितीनुसार, महान येथील गजानन महाराज विद्यालयाचे कर्मचारी राजेश लक्ष्मण करपे हे वाशीम जिल्ह्यातील तपोवन येथे नातेवाईकांकडे गेले होते.

ऑटोरिक्षा क्रमांक एमएच-३०-बीसी-०५४१ ने ते पिंजर वरून महानकडे रात्री ९ वाजताच्या सुमारास जात असताना पाठीमागून एका दुचाकीवर तिघेजण आले.

त्यांनी ऑटो रिक्षा थांबून करपे यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या वडीलांकडून अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लूटला व पळून गेले.

यावेळी लुटारूंचा प्रतिकार केला असता त्यांनी करपे यांना मारहाण सुद्धा केली. सदर घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम.एन. पडघन घटनास्थळी दाखल झाले होते.

त्यांनी पंचनामा करून आरोपीला शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. पुढील तपास ठाणेदार पडघन करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Rs 1 lakh looted by throwing chilli powder in eye, incident at Pinjar