esakal | RTE: दोन हजार सातशेवर विद्यार्थी राहणार प्रवेशापासून वंचित!
sakal

बोलून बातमी शोधा

akola news RTE: Two thousand seven hundred students will be deprived of admission!

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील २०२ शाळांना आरटीईसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे संबंधित शाळांतील १ हजार ९६० जागा आरटीई कोट्‍यातून रिक्त ठेवण्यात आल्या आहेत, परंतु आरटीई कोट्‍यातून प्रवेश मिळावा यासाठी ४ हजार ७२७ ऑनलाईन अर्ज करण्यात आल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे तब्बल २ हजार ७६७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.

RTE: दोन हजार सातशेवर विद्यार्थी राहणार प्रवेशापासून वंचित!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील २०२ शाळांना आरटीईसाठी नोंदणी केली होती. त्यामुळे संबंधित शाळांतील १ हजार ९६० जागा आरटीई कोट्‍यातून रिक्त ठेवण्यात आल्या आहेत, परंतु आरटीई कोट्‍यातून प्रवेश मिळावा यासाठी ४ हजार ७२७ ऑनलाईन अर्ज करण्यात आल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे तब्बल २ हजार ७६७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते, परंतु आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. हा कायदा शाळांचा प्रवेश टप्पा जेथून सुरू होतो त्या पहिल्या वर्गापासून राबवला जाताे. दरम्यान आरटीई प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत (३० मार्च) ४ हजार ४२७ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी अर्ज केले, परंतु केवळ १ हजार ९६० जागा रिक्त आहेत. त्यामुळे दोन हजार ७६७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागेल, असे चित्र आहे.
----------------
मुदतवाढीमुळे वाढले अर्ज
आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २१ मार्चपर्यंत निश्चित केली होती, परंतु पालकांना ओटीपी मिळण्यास तांत्रिक खोडा निर्माण झाल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना ३० मार्चपर्यंत अर्ज करता आले. त्यामुळे अधिक पालकांनी अर्ज केले.
-------------------
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
- नोंदणी केलेल्या शाळा - २०२
- आरक्षित जागा - १ हजार ९६०
- आतापर्यंत केलेले अर्ज - ४७२७
- अतिरिक्त अर्ज - २७६७

(संपादन - विवेक मेतकर)

loading image