
ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे लढत देणार आहे. या संदर्भात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अकोला ः ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे लढत देणार आहे. या संदर्भात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक मोठी संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. ही संघटना समाजात परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. मात्र, आता राजकीय पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड ग्रामपंचायत निवडणूकीत सहभाग नोंदवित आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशाेक पटाेकार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारसाकळ, अभिजित माेरे हे हाेते. संभाजी ब्रिगेडने राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका एकट्याने लढविण्याचे ठरविले असून, गावातही उत्तम कारभार होऊ शकतो, हे अनुभवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर खेडेकर यांनी बैठकीत केले.
(संपादन - विवेक मेतकर)