esakal | साडेसातशे तपासण्या, २४ पॉझिटिव्ह; ६८० रुग्णांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Seven hundred and fifty checks, 24 positive; Treatment of 680 patients

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अति संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच दिवसात तब्बल ७४४ चाचण्या घेण्यात आल्यात. त्यात २४ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कायम असल्याने सध्या जिल्ह्यातील ६८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

साडेसातशे तपासण्या, २४ पॉझिटिव्ह; ६८० रुग्णांवर उपचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या अति संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच दिवसात तब्बल ७४४ चाचण्या घेण्यात आल्यात. त्यात २४ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कायम असल्याने सध्या जिल्ह्यातील ६८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


गुरुवारी दिवसभरात २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यात डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मलकापूर, मोठी उमरी, र्कीती नगर, वाडेगाव, मूर्तिजापूर, जय हिंद चौक, मुझफरनगर, न्यू खेतान नगर, तेल्हारा, मुकुंदनगर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

आज सायंकाळी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात पाच महिला व सहा पुरुषाचा समावेश आहे. त्यात गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित बोरगाव मंजू, जठारपेठ, माळीपूरा, मलकापूर, शास्त्री नगर, राम नगर, व पातूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काल (दि.9) रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

२१ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १३, आयकॉन हॉस्पिटल येथून चार, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, अशा एकूण २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली
कोरोना संसर्ग झालेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ६८० रुग्ण उपाचार घेत असून, त्यात दररोज भर पडत आहे. जपर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ९७७० आहे. त्यातील ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ८७८९ आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image