आणखी सात जणांचा बळी; ३०० नवे पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 akola news Seven more killed; 300 new positives

कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त सात जणांचा शनिवारी (ता. १०) बळी गेला. त्यासोबतच ३०० नवे रूग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ४९९ झाली आहे. याव्यतिरिक्त शनिवारी (ता. १०) ३७६ जणांचा डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

आणखी सात जणांचा बळी; ३०० नवे पॉझिटिव्ह

अकोला  ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त सात जणांचा शनिवारी (ता. १०) बळी गेला. त्यासोबतच ३०० नवे रूग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ४९९ झाली आहे. याव्यतिरिक्त शनिवारी (ता. १०) ३७६ जणांचा डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला.

कोरोना ससंर्ग तपासणीचे शनिवारी (ता. १०) १ हजार ३९१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार २०१ अहवाल निगेटिव्ह तर १९० अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच रॅपिडच्या तपासणीत सुद्धा ११० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शनिवारी जिल्ह्यातील नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३०० झाली. याव्यतिरिक्त सात जणांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यात पहिला रूग्ण डाबकी रोड येथील ३५ वर्षीय पुरुष होते.

त्यांना १ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिलेचा झाला. या महिलेस ९ रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू पोळा चौक येथील ५२ वर्षीय पुरुष रूग्णाचा झाला. त्याला ६ रोजी दाखल केले होते. चौथा मृत्यू माळीपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष रूग्णाचा झाला. त्याला ६ रोजी दाखल करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू डाबकी रोड येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. त्याला ९ रोजी मृतावस्थेत दाखल केले होते. सायंकाळी खोलेश्वर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास १ रोजी दाखल करण्यात आले होते. सातवा मृत्यू तर ७५ वर्षीय माजरी ता. बाळापूर येथील पुरुष रुग्णाचा झाला. त्याला ६ रोजी दाखल करण्यात आले होते.
-------------------
या भागात आढळले रूग्ण
सकाळी १७० जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यात ६१ महिला व १०९ पुरुषांचा समावेश आहे. त्यात कौलखेड येथील ११, मोठी उमरी व तेल्हारा येथील ८ व इतर भागातील रहिवाशी रूग्णांचा समावेश आहे. सायंकाळी २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील कौलखेड येथील ३ व इतर भागातील रहिवाशी रूग्ण आहेत.
--------------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ३०४२८
- मयत - ४९९
- डिस्चार्ज - २६१९१
- ॲक्टिव्ह रूग्ण - ३७३८
(संपादन - विवेक मेतकर)

Web Title: Akola News Seven More Killed 300 New Positives

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaBalapurUmari