स्पर्श विरहित दर्शन व्यवस्थेचा शेगाव पॅटर्न, श्री दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंद

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 21 November 2020

भेटी लागी जिवा लागलीसे आस, या अभंगाप्रमाणे श्रींच्या लाखो भक्तांना दर्शनाची आस लागून राहिली होती. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेली बंधने आता शिथिल झाल्याने काही नियम पाळून दर्शनाची व्यवस्था संस्थानने सुरू केली आहे.

शेगाव/ बुलडाणा  : भेटी लागी जिवा लागलीसे आस, या अभंगाप्रमाणे श्रींच्या लाखो भक्तांना दर्शनाची आस लागून राहिली होती. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेली बंधने आता शिथिल झाल्याने काही नियम पाळून दर्शनाची व्यवस्था संस्थानने सुरू केली आहे.

यामध्ये श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात प्रवेश केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत कुठल्याही वस्तूला हात लावण्याचे काम पडू नये अशा पद्धतीने केलेली ही व्यवस्था म्हणजे भाविकांच्या सुविधेसाठीचा शेगाव पॅटर्न म्हणावा लागणार आहे. हाच पॅटर्न आता देशातील इतर संस्थांनीही राबविल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

राज्य शासनाने नुकतेच सर्व धार्मिक दर्शन स्थळे खुली केली आहेत, मात्र त्यासाठी काही बंधने घातलेली आहेत. विदर्भाची पंढरी आणि देशभरातील असे नव्हे तर विदेशातीलही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री संत गजानन महाराज होय. संस्थान च्या वतीने शासनाने घालून दिलेले कोणतेही नियम काटेकोर पाळण्याची परंपरा आहे.

ही परंपरा पाळत असतानाच संस्थाने एक स्तुत्य उपक्रम राबविला असून भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश केल्यापासून ते दर्शन करून बाहेर आल्यानंतर पर्यंत एकाही वस्तूला हात लावण्याची गरज भासत नाही. यामुळे दर्शन तर होतेच मात्र कुणाशीही संसर्ग होत नाही. ही विशेष बाब होय. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर सुरवातीला दर्शन पास आहे किंवा नाही हे तपासले जाते. आधार कार्ड तपासले जाते.

याशिवाय तोंडाला मास्क आवश्यक आहे. मंदिरात प्रवेश करताना कोणताही हार-फुले, प्रसाद नारळ चिरंजी, पेढे, उदबत्ती इत्यादी कोणतेही साहित्य आत नेऊ दिले जात नाही. दर्शनास आल्यानंतर प्रवेशद्वारासमोरच थर्मल स्क्रीनिंग व हात सॅनीटाईज केले जातात. त्यानंतर जागोजागी भाविकांसाठी सुरक्षिततेच्या सूचना लिहिलेल्या आहेत.

त्यामध्ये मूर्त्यांना, आजूबाजूला रेलिंगला किंवा भिंतीला स्पर्श करू नये. ग्रंथाचे पारायण करू नये. प्रत्येकाने दोन भाविकांमध्ये सहा फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, अशा सूचनांचा समावेश आहे. याशिवाय मंदिरामध्ये दहा वर्षाच्या आतील मुले व ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिला व रेड झोन कंटेनमेंट घेऊन व होम कोरनन टाईन असलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे.

भाविकांनी दर्शनासाठी येताना ई पास व पासचा आयडी क्रमांक, आधार कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे. कोरोनामुळे सर्व भाविकांनी आपली जबाबदारी स्वतःलाच घ्यावी व सुरक्षित राहावे आरोग्य सेतू प डाऊनलोड करून ठेवावा तसेच सूचना करण्यात आलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या श्री संस्थानचे निवास संकुल व भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र महाप्रसाद तूर्तास बंद ठेवण्यात आलेला आहे.

हात- पाय धुतानाही स्पर्श नको
संस्थांमध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये भाविकांना पाय धुण्यासाठी स्वयंचलित पाइपद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या पाइप ला स्पर्श करण्याची देखील गरज भासत नाही. याशिवाय हात धुण्याच्या करिता नळाला हात लावण्याची गरज नाही. त्याठिकाणी पायाने खटका दाबल्यानंतर आपोआप नळातून पाणी येते. तसेच चप्पल ठेवतानाही चप्पल आपली आपण पायानेच उचलून रॅकमध्ये ठेवू शकतो.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Shegaon pattern of touchless darshan system, Gajanan Maharaj darshan brings happiness to devotees