
शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेश वानखडे यांचे वडील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे यांचे २९ ऑक्टोबर रोजी आजारामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाले अन् भाऊ रुग्णालयातच आजारी असल्यामुळे बहिनीने मुखाग्नि देऊन अंत्यसस्काराचा कार्यक्रम पार पाडला.
तेल्हारा (जि.अकोला) ः शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेश वानखडे यांचे वडील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे यांचे २९ ऑक्टोबर रोजी आजारामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाले अन् भाऊ रुग्णालयातच आजारी असल्यामुळे बहिनीने मुखाग्नि देऊन अंत्यसस्काराचा कार्यक्रम पार पाडला.
तेल्हारा शहरातील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत होते.
परंतु २९ ऑक्टोबरला उपचार घेताना त्यांचा मृत्यु झाला. मुलगा राजेश सुद्धा आजारी असल्यामुळे अकोला येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
त्यामुळे वडिलांच्या मृत्युच्या अंत्यसस्काराची जबाबदारी मुलीवर आल्यामुळे अकोला येथील मोहता मिल मोक्षधाम येथे मुलगी रूपाली प्रदीपराव उकळकार यांनी वडिलांना मुखाग्नी देऊन अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पाडला.
(संपादन - विवेक मेतकर)