Video: राजकीय वैमनस्य: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या  सोयाबीनला आग 

अरूण जैन 
Saturday, 17 October 2020

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या राहत्या गावातील शेतात असलेल्या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात व्यक्तींने आग लावून दिली.

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या राहत्या गावातील शेतात असलेल्या सोयाबीनच्या सुड्यांना अज्ञात व्यक्तींने आग लावून दिली. संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले.  त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवार (ता. 16 ) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविकांत तुपकर यांनी बुलडाणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडला असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे.

रविकांत तुपकर यांची राहते गाव सावळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य ही शेती पाहतात. यावर्षी या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केलेली होती.  पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी सदर सूड्या झाकून ठेवण्यात आलेल्या होत्या.

मात्र अज्ञात व्यक्तीने या दोन गंजीला आग लावून त्या पेटवून दिल्या. या घटनेमुळे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे तुपकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी

ज्यांची समोरासमोर लढण्याची हिम्मत नसते अशीच मंडळी हे प्रकार करतात मात्र त्यांनी कितीही त्रास दिला तरी माझा आवाज दाबणे शक्य होणार नाही अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली. अशा समाजकंटकांना वेळीच वेसन घालावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Soybean fire in Ravikant Tupkars field due to political enmity