esakal | अकोला मार्गावर धावत्या कारने घेतला पेट
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: A speeding car on Akola road took his stomach

अकोट अकोला रोडवर वनी वारुळा फाट्याजवळ एका इंडिका कारला अचानक आग लागली ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही या आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

अकोला मार्गावर धावत्या कारने घेतला पेट

sakal_logo
By
राजकुमार वानखडे

वणी वारुळा (जि.अकोला) : अकोट अकोला रोडवर वनी वारुळा फाट्याजवळ एका इंडिका कारला अचानक आग लागली ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही या आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

ही कार कुठली व कुणाची आहे याची माहिती अघाप पर्यंत मिळाली नाही मात्र या आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते कार पेटल्या बाबतची माहितीअकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे चालक व हेड कॉन्स्टेबल गोंडचवर हे अकोल्यावरून अकोटकडे जात असताना कार पेटल्या ची माहिती अकोट ठाणेदार ज्ञानोबा फड यांना दिली.

तसेच अग्निशामक दलास पाचारण करण्यास सांगितले अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरीत येऊन पेटलेली कार विझवली. परंतु कार पूर्णपणे जळून खाक झाली होती यावेळी बीट जमादार मनोज कोल्हटकर ,पोका बुंदे , पोका गोलोकार,पोका चव्हाण,पोका वैराळे,पोका हासुडे,सह ग्रामीण पोलिस दाखल झाले होते.

विशेष म्हणजे या कारमध्ये कोणी नव्हते. कार ने पेट घेताच कारचालक कागदपत्रे घेऊन निघून गेला असल्याचे समजते..तसेच ही कार शेगाव येथील असल्याचे बोलले जात आहे पुढील तपास अकोट  ग्रामीण पोलिस करत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image