esakal | 24 मार्चपासून उभी असलेली लालपरी आजपासून पुन्हा धावणार पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News ST in service again from today, the question of disinfection forever

अकोला जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गावर प्रवाशी प्रतिसाद बघून टप्प्याने बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्रवासासाठी प्रथम पसंती असलेल्या एसटी महामंडळाची बस सेवा २४ मार्चपासून बंद होती.

24 मार्चपासून उभी असलेली लालपरी आजपासून पुन्हा धावणार पण...

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला  ः कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन काळात बंद असलेली बस सेवा गुरुवारपासून (ता. २०) नियमित वेळापत्रकानुसार सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गावर प्रवाशी प्रतिसाद बघून टप्प्याने बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्रवासासाठी प्रथम पसंती असलेल्या एसटी महामंडळाची बस सेवा २४ मार्चपासून बंद होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सर्वसामान्यांसाठी बंद असलेल्या बस सेवेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.

या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणून अखेर गुरुवारपासून लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होते आहे. यासंदर्भात राज्य शासनाने एसटी महामंडळाला परवानगी दिली आहे. त्यानुसार अकोला विभागातील बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती वभागीय वाहतू नियंत्रक समिती सुतवणे यांनी दिली.

मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
बस सेवा सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात यापूर्वी सूचना दिल्या होता. आता बसने प्रवास करताना कोणत्याही परवानगीची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे कोणत्या नियमांचे पालन करीत प्रवाशांसाठी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, याबाबत एसटी महामंडळाच्या मुख्यालयातून मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहे. त्यानुसार बस सेवा सुरू केली जाईल.

जिल्हा मुख्यालयाशी जोडली जातील तालुका मुख्यालये
प्रवाशी साधणांअभावी तालुका मुख्यालयातून जिल्हा मुख्यालयात येण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. आता बस सेवा सुरू होत असल्याने हा संपर्क पुन्हा सुरू होईल.

निर्जंतुकिरणाचे प्रश्न कायमच
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बस सेवा सुरू करताना बसचे प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकिरण करण्याचा प्रश्न कायम राहणार आहे. तेवढी सक्षम यंत्रणा सध्या तरी एसटी महामंडळाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना कोरोना संसर्गाचा धोका कायम राहणार आहे.

शासनाने दिलेल्या परवानगीनुसार जिल्ह्यातील बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. सर्व प्रमुख मार्गावर नियोजित वेळापत्रकानुसार प्रवाशी प्रतिसाद बघून बस फेऱ्या सुरू करण्यात येतील. मुख्यालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गुरुवारपासून बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- समिता सुतवणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top