बेळगावातील पुतळ्याचे महाराष्ट्रात पडसाद, या जिल्ह्यात शिवसेनेतर्फे होणार 27 ठिकाणी आंदोलने

मनोज भिवगडे
Monday, 10 August 2020

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती गावातील शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटकच्या भाजप सरकारने हटविला. त्याचे पडसाद अकोल्यातही उमटत आहे. शिवसेनेच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ अकोला जिल्हा व शहरात एकाच वेळी २७ ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

अकोला  ः कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती गावातील शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटकच्या भाजप सरकारने हटविला. त्याचे पडसाद अकोल्यातही उमटत आहे. शिवसेनेच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ अकोला जिल्हा व शहरात एकाच वेळी २७ ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा घटविण्याच्या घटनेचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहे. भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकात मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या आदेशाने मनगुत्ती गावातील पुतळा हटविण्यात आला.

त्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यात एकाचवेळी २७ ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. अकोल्यात जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत धिंग्रा चौकात तर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन होईल.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

याशिवाय राजेश मिश्रा व अतुल पवनीकर यांच्या नेतृत्वात अनुक्रमे जयहिंद चौक व सिव्हिल लाईन्स चौकात पुतळा जाळण्यात येणार आहे.

या आंदोलनासोबतच तुकाराम चौक, हरिहरपेठ, कृषीनगर, राष्ट्रीय महामार्गावर शिवर चौक, मूर्तिजापूर येथे अप्पू तिडके यांच्या नेतृत्वात चक्काजाम

 मूर्तिजापूर शहरात पुतळा दहन, बार्शीटाकळी बडू ढोरे यांच्या नेतृत्वात येथे पुतळा दहन, पिंजर येथे चक्का जाम, महान येथे चक्काजाम, कान्हेरी सरप, अकोली फाटा, देवरी फाटा, निंबा फाटा, बाळापूर शहर, पारस फाटा, वाडेगाव, पातूर शहर, आलेगाव, हिवरखेड, तेल्हारा शहर, दहिहांडा फाटा, म्हैसांग येथे चक्काजाम व पुतळा दहन करून निषेध नोंदविण्यात येणार आहे. 
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola news Statue of Belgaum statue in Maharashtra,Shiv Sena will hold agitations in 27 places in this district