ब्रेकींग: शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना लाभ मिळत नसल्याने चक्क समाजकल्याण कार्यालयालाच ठोकले कुलुप

विवेक मेतकर
Friday, 14 August 2020

जिल्ह्यातील एससी,एसटी,ओबीसी,व्हिजेएनटी यांच्यासह इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण कार्यालयाकडुन शिष्यवृत्तीचा व स्वाधार योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी थेट समाजकल्याण कार्यालयालाच आज कुलुप ठोकले आहे. 

अकोला: जिल्ह्यातील एससी,एसटी,ओबीसी,व्हिजेएनटी यांच्यासह इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण कार्यालयाकडुन शिष्यवृत्तीचा व स्वाधार योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी थेट समाजकल्याण कार्यालयालाच आज कुलुप ठोकले आहे. 

जिल्ह्यातील एससी,एसटी,ओबीसी,व्हिजेएनटी यांच्यासह इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण कार्यालयाकडुन शिष्यवृत्तीचा व स्वाधार योजनेच्या बाबतीत माहिती मिळावी ह्या साठी सम्यक पदाधिकारी समाज कल्याण मध्ये दाखल झाले होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पुर्वसुचना देऊन सुद्धा कार्यालयातील संबंधित अधिकारी गैरहजर राहल्याने पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे कार्यालय अधिक्षक काळे यांना समज देऊन पदाधिकाऱ्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कॅबिनला सील ठोकले.

त्यानंतर समाज कल्याण च्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप ठोकण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे, वंचितचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे,
सम्यक विद्यार्थी आंदोलनचे राज्यसचिव हितेश जामनिक,पश्चिम विदर्भ समन्वयक नितेश किर्तक,जिल्हाध्यक्ष राजकुमार दामोदर,जिल्हा महासचिव धिरज इंगळे,प्रतुल विरघट,हर्षदा डोंगरे,जिल्हा संघटक आकाश गवई,जिल्हा प्रवक्ता विशाल नंदागवळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पवन गवई, जिल्हा कोषाध्यक्ष विकेश जगताप, जिल्हा सचिव सुमित वाकोडे,जयराज चक्रनारायन,शेखर इंगळे,पंकज दामोदर,शुक्लोधन वानखडे,सचिन शिरसाट,नितिन सपकाळ,संदर्भ डोंगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As Akola News students are not getting the benefit of scholarship, Chakka has locked the social welfare office