
अकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाईपने मारहाण करून हत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. अकोट येथील ग्रामीण पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
अकोट (जि.अकोला) : अकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाईपने मारहाण करून हत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. अकोट येथील ग्रामीण पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
बोडीँ गावा जवळ असलेल्या सुकळी येथील सिध्दार्थ जगन्नाथ धुंदे यांने लोखंडी पाईपने पत्नी शितल धुंदे हिला मारहाण केली.
जबर मार लागल्याने रक्ताचे थोराळ्यात ती जागेवरच कोसळुन गतप्राण झाली आहे. आरोपी पती सिध्दार्थ धुंदे याला पत्नीचे हत्या केल्याचे आरोपाखाली अटक केली. पुढील तपास ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व कर्मचारी करीत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)