esakal | शासनाच्या नाकर्तेपणामुळे शिक्षक दिन काळा दिवस पाळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Teachers will observe a black day due to the government's denial

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात वेळोवेळी अनेक निवेदने दिली आहेत. शिक्षण मंत्री याचे समवेत १८ फैब्रुवारी २०२० ला बैठक सुद्धा झाली होती. परंतु शिक्षकांच्या मान्य मागण्यांचे आदेश निर्गमित होत नाहीत. इतर घटकांना न्याय दिला जातो मात्र शिक्षकांच्या प्रश्नाला ताटकळत ठेवले जाते. शासनाची शिक्षकाप्रती ही नाकर्तेपणाची भूमिका असल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील शिक्षक ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचे विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी म्हटले आहे.

शासनाच्या नाकर्तेपणामुळे शिक्षक दिन काळा दिवस पाळणार

sakal_logo
By
गणेश शिंदे

मेहकर (जि.बुलडाणा) : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात वेळोवेळी अनेक निवेदने दिली आहेत. शिक्षण मंत्री याचे समवेत १८ फैब्रुवारी २०२० ला बैठक सुद्धा झाली होती. परंतु शिक्षकांच्या मान्य मागण्यांचे आदेश निर्गमित होत नाहीत. इतर घटकांना न्याय दिला जातो मात्र शिक्षकांच्या प्रश्नाला ताटकळत ठेवले जाते. शासनाची शिक्षकाप्रती ही नाकर्तेपणाची भूमिका असल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील शिक्षक ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचे विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी म्हटले आहे.


शाळांना मूल्यांकन पात्र घोषित केले. अनुदानाची तरतूद केली असतानासद्धा अनुदान वितरणाच्या आदेश प्रलंबित आहे. राज्यातील हजारो विनावेतन काम करणारे शिक्षक आजही किमान २० टक्के वेतनापासूनसुद्धा वंचित आहेत. यासह अघोषितला अनुदानासह घोषित करुण प्रचलित पद्धतीने अनुदान वितरणाचा शासन आदेश तातडीने निर्गमित करावा.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मात्र राज्यातील टप्पा अनुदानातील शिक्षक त्यापासून वंचित त्यांच्यावरचा अन्याय दुर करावा. न्यायिक कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी. वाढीव अनुदानित पदावर कार्यरत शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. त्यांना मान्यता व वेतन देण्यात यावे, आयटी विषयाला अनुदान द्यावे व विनावेतन अल्प वेतन शिक्षकांची वेठबिगारी अवस्था संपवावी.७ व्या वेतन आयोगाप्रमाणे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षांच्या सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू केली मात्र शिक्षकांना त्यापासून वंचित ठेवले शिक्षकांनासुद्धा ही योजना लागू करावी यासह इतर मान्य मागण्याची पुर्तता करावी, यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना आंदोलनाचे निवेदन सादर करून ५ सप्टेंबर शिक्षक दिन काळा दिवस पाळण्याचे आवाहन विज्युक्टाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. शिवराम बावस्कर जिल्हा सचिव प्रा. किशोर काकडे, प्रा. संजय किंनगे, प्रा रवींद्र काळे, उपाध्यक्ष प्रा. डॉ गणेश भरगडे, प्रा गजानन गाडेकर, प्रसिद्धी प्रमुख प्रा. गणेश शिंदे सर्व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)