पातूर घाटात भयानक अपघात, एक ठार, दुसरा गंभीर

श्रीकृष्ण शेगोकार
Wednesday, 19 August 2020

येथील म्हसोबा घाटमध्ये ट्रक चालकचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी, ता. १७ ऑगस्टच्या रात्री ११:३० वाजता च्या दरम्यान घडली.

पातूर (जि.अकोला) : येथील म्हसोबा घाटमध्ये ट्रक चालकचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी, ता. १७ ऑगस्टच्या रात्री ११:३० वाजता च्या दरम्यान घडली.

चेन्नई येथून ट्रक क्रमांक एमपी ०९ एचएच ९७३३ हा अकोला येथे दगडी कडप्पा नेत असताना पातूर घाटात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रक टेकडीवर जाऊन आदळला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

यात ट्रक ड्रायव्हर मुबारिक खान (रा. बहेदपूर) हा जागीच ठार झाला तर क्लीनर धर्मेंद्र चौहान हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पातूर येथील निशांत गवई, स्वप्नील सुरवाडे, दुले खा यांनी तत्काळ जखमीला उपचारासाठी पातूर येथील प्राथ. आरोग्य केंद्रात आणले.

डॉ. चिराग रेवाळे, परिचारिका गायकवाड यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे रवाना केले. घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार गजानन बायस ठाकूर यांचे मार्गदर्शन खाली ससाणे जमदार, चालक ठाकूर, जगदीश शिंदे यांनी घटनास्थळावर धावून घेवून पंचनामा केला.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Terrible accident in Patur Ghat, one killed, another serious