पाणी पुरवठा विहीर कुणाची, 32 वर्षानंतरही दप्तरी नोंद नाही

akola news There is no record of anyones water supply well, even after 32 years
akola news There is no record of anyones water supply well, even after 32 years

सुलतानपूर (जि.बुलडाणा)  : लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द गावासाठी 1988 ते 89 दरम्यान बांधकाम करण्यात आलेल्या पाणीपुरवठा विहिरीची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नसल्यामुळे मंजूर झालेला सौर ऊर्जा प्रकल्प विहिरीवर टाकायचा नाही अशी आक्रमक भूमिका संबंधित शेतकर्‍याने घेतल्यामुळे सैरावैरा झालेल्या प्रशासनाची तारांबळ उडाली असता त्या विहिरीची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नसल्याचे बिंग फुटले आहे.
लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द गावासाठी 1988 ते 89 दरम्यान मेहकर तालुक्यातील कळपविहीर या गावालगत असलेल्या धरणाशेजारील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते. 

खोदकाम करतेवेळी शेतकर्‍याची मंजुरात घेऊन शेतकर्‍याला त्यावेळी शासनाकडून त्या वेळच्या नियमानुसार मोबदला देखील देण्यात आलेला होता. सदर गावासाठी ही विहीर व पाणीपुरवठा योजना ही जीवनदायी ठरलेली होती. बत्तीस वर्षांच्या काळामध्ये गावाला मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. यामुळे गावकर्‍यांची भर उन्हाळ्यात देखील पाण्यासाठी भटकंती होत नव्हती जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेली ही विहीर व पाणी पुरवठा योजना गावासाठी जीवनदायी ठरली होती.

विहिरीच्या खोदकाम व बांधकामावर आतापर्यंत लाखो रुपयांचा निधी या कालावधीमध्ये खर्च झाल्याची माहिती देखील मिळत आहे. भरपूर पाणीसाठा असलेल्या व्हेरी मधून फक्त विद्युतपुरवठा अभावी गावकर्‍यांना नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नव्हते त्यामध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे. विद्युत रोहित्र वारंवार नादुरुस्त राहत असल्याने तसेच अनेक छोट्या मोठ्या कारणामुळे विद्युत पुरवठा खंडित होत असे त्यामुळे गावकर्‍यांना दररोज मिळणारे पाणी दिवसाआड तर कधी तीन ते चार दिवसानंतर मिळत होते म्हणून संबंधित ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व प्रशासनाने या बाबीची दखल घेत पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीवर सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला. सौर ऊर्जा प्रकल्प विहिरीच्या बाजूला मांडण्यासाठी शेजारील शेतकर्‍याची आठ ते दहा गुंठे जमीन देखील शासनाच्या नियमाप्रमाणे घेतली. परंतु, सदर विहिरीवर सौरऊर्जा पंप टाकायचा नाही अशी आक्रमक भूमिका संबंधित शेतकर्‍याने घेतल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असता सदर विहीर वरील सौर ऊर्जा प्रकल्प शेतकरी टाकू देत नाही म्हणून त्याची रीतसर तक्रार करण्याचे ठरले असता ग्रामपंचायत दप्तरी ना त्या  विहिरीचा ठराव आढळून आला ना त्यावेळी संबंधित शेतकरी याने दिलेले  दानपत्र आढळून  आले त्यामुळे संबंधित विहिरीची नोंदच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नसल्याची माहिती सूत्राकडून मिळाली असल्यामुळे सर्वच यंत्रणा हतबल झाली आहे सदर शेतकर्‍याने स्वतःच्या शेतात असलेली ग्रामपंचायत च्या पाणीपुरवठा करणारी विहिरी ची नोंद स्वतःच्या सातबारा  वर केली असल्याची माहिती देखील मिळत आहे एकंदरीत लाखो रुपये खर्च करून गावासाठी जीवनदायी ठरलेली ही योजना सध्यातरी  प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कुचकामी  ठरत असल्याचे दिसून येत आहे.

गत 32 वर्षापासून सदर पाणीपुरवठा योजना ही अंजनी गावकर्‍यांसाठी जीवनदायी होती. त्यामुळे या गावावर कधी पाणीटंचाईची भीषण समस्या जाणवली नाही. संबंधित अधिकार्‍यांनी या बाबीकडे वेळीच लक्ष घालून सौर ऊर्जा प्रकल्प्प कार्यान्वित करावा.
- अनिल मानवतकर, सामाजिक कार्यकर्ते, अंजनी खुर्द.

पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी बाबतची ग्रामपंचायतीकडे असलेली कागदपत्रे मागविण्यात आलेली आहेत. त्यानंतरच नेमके कारण काय हे सांगता येईल.
- अस्मिता तांबे, गटविकास अधिकारी, लोणार.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com