
जिल्हा परिषदेच्या मिनी मार्केटमधील दुकानांचे भाडे वाढण्याचा ठराव गुरुवारी (ता.१०) हाेणाऱ्या सर्व साधारण सभेत मांडण्यात येणार आहे. १ ते १९ दुकांनाना प्रती माह ७ हजार तर २० व्या नंबरच्या दुकानाला २ हजार ७०० रुपये दर सहउपनिबंधकांनी सूचवला असून, हे दर २०१९च्या रेडीरेकनरनुसार निर्धारित करण्यात आले आहे. या विषयासह उद्याच्या सभेत इतर विषयांवर वादळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या मिनी मार्केटमधील दुकानांचे भाडे वाढण्याचा ठराव गुरुवारी (ता.१०) हाेणाऱ्या सर्व साधारण सभेत मांडण्यात येणार आहे. १ ते १९ दुकांनाना प्रती माह ७ हजार तर २० व्या नंबरच्या दुकानाला २ हजार ७०० रुपये दर सहउपनिबंधकांनी सूचवला असून, हे दर २०१९च्या रेडीरेकनरनुसार निर्धारित करण्यात आले आहे. या विषयासह उद्याच्या सभेत इतर विषयांवर वादळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
सिव्हिल लाईन्स परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीची दुकाने आहेत. यामध्ये एकूण २० गाळे आहेत. काही महिन्यांपूर्वी ८ गाळेधारांच्या करारनाम्याचे नुतणीकरण करण्यात आले होते. त्यामध्ये चार पाेटभाडेकरूंचा समावेश असल्याचीही चर्चा रंगली हाेती.
या गाळ्यांचे भाडे वाढविण्याचा ठराव १० डिसेंबर राेजीच्या जि.प.सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. या सभेत एकूण ३७ ठराव मांडण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने वाण धरणातून ६९ गावे पाणीपुरवठा याेजना, व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानचे नियामक मंडळाला मंजुरी देणे, कान्हेरी (सरप) ग्रा.पं. इमारत पाडणे, जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे, दुधाळ जनावरे वाटप, बियाणे वितरण, शिकस्त वर्ग खाेल्या पाडणे, हातपंप दुरुस्ती कंत्राट देणे, शिवणी येथील पाझर तलाव हस्तांतरण न करणे, बाेरगाव निंघाेट व राजंदा पाझर तलावाच्या कामाला सुधािरत मंजुरी देणे, वसाली ते वाडी रस्ता आणि तुलंगा-सांगाेळा-चतारी रस्ता बांधकामाची निविदा स्वीकृती, भांबेरी पाणीपुरवठा याेजनेबाबत नाहरकत प्रमाणपत्र देणे आदींचा समावेश आहे. विषयांच्या गर्दीत होणाऱ्या या सभेतील चर्चेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)