
कारंजा तालुक्यातील मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिरालगतच्या परिसरात विचित्र अपघातात दोन जण ठार तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 11 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
कारंजा लाड (जि.वाशीम): कारंजा तालुक्यातील मूर्तिजापूर मार्गावरील जुडवा हनुमान मंदिरालगतच्या परिसरात विचित्र अपघातात दोन जण ठार तर, दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 11 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका या पदावर कार्यरत असणाऱ्या पुजा चव्हाण ह्या आपली ड्युटी बजावून आपल्या गावी तालुक्यातील ग्राम भडशिवणी येथे अक्षय विजय राठोड वय 32 वर्षे यांच्यासमवेत जात असतांना जुडवा हनुमान नजीक विचित्र अपघात घडून यामध्ये उपरोक्त दोघे जण ठार झाले
. तर, ऋषिकेश संजय लळे वय 25 वर्षे रा. काकडशिवनी, गणेश श्रीराम सांगोळे वय 55 वर्षे रा. प्रभात टॉकीज रोड हे गंभीर जखमी झाले. या विचित्र अपघाताची नेमकी माहिती मिळू शकली नाही. शिवाय, या अपघातामध्ये चारचाकी व दोन दुचाकी यांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती प्राप्त आहे.
(संपादन विवेक मेतकर)