भाऊबिजेच्या पूर्वसंध्येलाच अज्ञात वाहनाने दिली धडक

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 20 November 2020

बार्शिटाकळी वरून जवळच असलेल्या पिंपळखुटा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक २५ वर्षीय युवक गतप्राण झाल्याची घटना रविवारी (ता.१५) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

विझाेरा (जि.अकोला) ः बार्शिटाकळी वरून जवळच असलेल्या पिंपळखुटा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक २५ वर्षीय युवक गतप्राण झाल्याची घटना रविवारी (ता.१५) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

दिनेश प्रकाश शिंदे (वय २५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिंदे रात्रीला पाहरेकरिता शेतात माेटरसायकल एम.एच. ३० एक्स. ५५२२ ने जात असतांना विझाेरा कडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने ऊडविले.

धडक एवढी जबर होती की, त्यामध्ये दिनेशचा जागीच मृत्यू झाला. दिनेशच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. बार्शिटाकळी पाेलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातास कारणीभुत ठरलेल्या वाहनाचा करत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: An unidentified vehicle hit on the eve of Bhaubija

Tags
टॉपिकस
Topic Tags: