esakal | बाळापूरात १७ केंद्रांवरील लसीकरण ठप्प

बोलून बातमी शोधा

 akola news Vaccination halted at 17 centers in Balapur

बाळापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील पारस, हातरूण, उरळ व वाडेगाव या चार प्राथमिक आरोग्य केन्द्र व केन्द्रा अंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होते. मात्र शनिवारी (ता. १०) तालुक्यातील सतराही केन्द्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसीचा तुटवडा निर्माण झाला.

बाळापूरात १७ केंद्रांवरील लसीकरण ठप्प

sakal_logo
By
अनिल दंदी

बाळापूर (जि.अकोला)  : बाळापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील पारस, हातरूण, उरळ व वाडेगाव या चार प्राथमिक आरोग्य केन्द्र व केन्द्रा अंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होते. मात्र शनिवारी (ता. १०) तालुक्यातील सतराही केन्द्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे शनिवारी सतराही केन्द्रावर शुकशुकाट दिसून आला. दुपारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी आल्या पावली परत जावे लागले.

बाळापूर शहरासह सतरा केन्द्रावर पहिल्या टप्प्यांत बाळापूर ग्रामीण रुग्णालय, पारस, हातरूण, वाडेगाव व उरळ या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी पाचशे व त्या नंतर सहाशे कोवीड प्रतिबंधक लसी उपलब्ध झाल्या होत्या. या केंद्रांवर सरासरी शंभरच्या आसपास रोज लसीकरण होत होते. त्यादृष्टीने रोज किमान एक हजार डोस इतका लसीचा साठा उपलब्घ होणे आवश्यक आहे. यात सतराही केंद्रांवर तुटवडा असून नागरिकांना परत जावे लागत आहेत. त्यात लसीचा साठा शून्यावर गेला आहे.
----------------
लसीकरणाला ‘नको’ म्हणणाऱ्यांची धाव
बाळापूर तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. सुरुवातीला लसीकरणाला नकार देणारे ज्येष्ठ नागरिक मात्र आता लस संपताच कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत; परंतु लस शिल्लक नसल्याने लसीकरण ठप्प आहे. लसीकरणा नंतर होणाऱ्या त्रासाच्या गैरसमजातून अनेक जेष्ठ नागरिकांनी लस घेण्याचे टाळले होते. मात्र, त्यांच्या मनातील भीती कमी करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केन्द्राकडे लसीकरणासाठी जाण्यास सुरूवात केली असली तरी लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने जेष्ठांचे हाल होत आहेत.
-----------

बाळापूर ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सतरा लसीकरण केन्द्रातील लशी संपल्या आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे लसींची मागणी केली आहे.
- डॉ. भावना हाडोळे
तालुका वैद्यकीय अधिकारी, बाळापूर
(संपादन - विवेक मेतकर)