सरकारी पैसेवारीवर ग्रामस्थांचा आक्षेप; पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आकारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

खरीप हंगामातील सर्वच पिकांना अतिवृष्टी तथा नैसर्गिक संकटांनी व्यापले आहे. त्यामुळे कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या घरात सुखासमाधानाने आलेले नाही. त्यानंतर सुद्धा दहिगावची पैसेवारी ६६ पैशांपेक्षा काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

तेल्हारा (जि.अकोला)  ः खरीप हंगामातील सर्वच पिकांना अतिवृष्टी तथा नैसर्गिक संकटांनी व्यापले आहे. त्यामुळे कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या घरात सुखासमाधानाने आलेले नाही. त्यानंतर सुद्धा दहिगावची पैसेवारी ६६ पैशांपेक्षा काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

या पैसेवारीवर ग्रामस्थांनी आक्षेप घेत तेल्हारा तहसीलदार यांना दिनिवेदन देवून पैसेवारी ५० पेक्षा कमी पैसेवारी आकारण्याची मागणी केली.

तेल्हारा तहसील अंतर्गत येत असलेल्या दहिगाव अवताडे शिवारातील पिकांची स्थिती अतिशय बिकट झालेली आहे. उडीद, मूग, सोयाबीनचे पिके मातीमोल झाले, तर कपाशीच्या पिकावर बोंड अळी आली.

त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणी व लागवडीचा खर्च ही निघेणासा झाला आहे. अशा स्थितीत दहिगावची पैसेवारी ६० पैशांवर काढलीच कशी? प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेत बांधावर जाऊन पाहिले असते तर कदाचित एवढी मोठी पैसेवारी काढण्याचे धाडस झाले नसते.

केवळ जमिन महसूल गोळा करण्यासाठी पैसेवारी मोठ्या प्रमाणात काढण्यात येते, असा आरोप सदर निवेदनातून लावण्यात आला आहे. त्यामुळे या सुधारित पैसेवारीवर शेतकरी नाराज असून नैसर्गिक आपत्ती लक्षात संपूर्ण दहिगाव शिवारची पैसेवारी ५० पैशांच्या आत काढण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात .सरपंच अरुणा चंदन, उपसरपंच स्वप्नील भारसाकळे, पोलिस पाटील अरविंद अवताडे यांच्या सह प्रवीण धरमकर, गोपाल अवताडे, समाधान काकड, राहुल झापर्डे, नंदकिशोर बावस्कर, योगेश भारसाकळे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांनी ही मागणी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Villagers object to government pay; Size less than 50 paise