
तब्बल ८ महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर हिवरा आश्रम येथील आठवडी बाजार मंगळवारी (ता.१०) भरला. यामुळे हिवरा आश्रम सह खेड्यापाड्यातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. हिवरा आश्रम येथे पहिल्याच बाजाराला विक्रेत्यासह ग्राहकांचा अल्पसा प्रतिसाद दिसून आला.
हिवरा आश्रम (जि.बुलडाणा) : तब्बल ८ महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर हिवरा आश्रम येथील आठवडी बाजार मंगळवारी (ता.१०) भरला. यामुळे हिवरा आश्रम सह खेड्यापाड्यातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. हिवरा आश्रम येथे पहिल्याच बाजाराला विक्रेत्यासह ग्राहकांचा अल्पसा प्रतिसाद दिसून आला. मात्र बाजारात विक्रेते आणि ग्राहकांना मास्क, सोशल डिस्टसिंगचा विसर पडल्याचे दिसून आले. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना व खबरदारी घेण्यात आली. शासनाकडून लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर शहर तसेच ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद करण्यात आले होते. आठवडी बाजार बंद झाल्यामुळे बाजाराची ठिकाणे ओस पडली होती. बाजार बंद असल्यामुळे ग्राहकांना भाजीपाल्यासाठी ज्यादा किंमत मोजावी लागत होती. हिवरा आश्रम हे जवळपासच्या वीस ते पंचवीस खेड्यातील गावासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आज ग्रामीण भागातील अनेक स्त्री, पुरूष बाजार खरेदी करण्यासाठी आठवडी बाजारात आले होते. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यानंतर प्रथमच हिवरा आश्रम येथील आठवडी बाजार भरल्याने गावातील तसेच जवळपासच्या खेड्यातील स्त्री, पुरूषांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजाराकडे धाव घेतली. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अजून सुध्दा पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलतांना सांगीतले. अद्याप सुध्दा अपेक्षेप्रमाणे भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक बाजाराकडे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर हिवरा आश्रम येथील बाजार खुला झाल्यामुळे बाजारातील छोटया,मोठया भाजीपाला विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हिवरा आश्रम येथील आठवडी बाजार सुरू झाल्यामुळे आर्थिक चक्र पुन्हा पुर्ववत होण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या नऊ महिन्यापासून येथील आठवडी बाजार बंद होता. अजून सुध्दा जवळपासच्या खेड्यातील ग्राहकांना बाजार सुरू होणार नसल्याची कल्पना नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे व्यवसाय झाला नाही. आठवडी बाजार सुरू झाल्यामुळे आर्थिक चक्र पूर्ववत होईल. अनेक कुटुंबांना मिळाला रोजगार (संपादन - विवेक मेतकर) |
|||