esakal | नदी पार करताना चार महिला अचानक पुराच्या पाण्यात पडल्या अन् पुढे पहा काय झाले
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: While crossing the river, four women suddenly fell into the flood waters

नदी पार करण्यासाठी तराफ्यावर बसलेल्या चार महिला अचानक पाण्यात पडल्या. दोन तरुणांनी जीवावर उदार होऊन त्यांचे प्राण वाचविण्याचे काम केल्याचा प्रकार लोणार तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या रायगाव येथे मंगळवार (ता. १५) घडला.

नदी पार करताना चार महिला अचानक पुराच्या पाण्यात पडल्या अन् पुढे पहा काय झाले

sakal_logo
By
श्याम सोनुने

लोणार (जि.बुलडाणा)  : नदी पार करण्यासाठी तराफ्यावर बसलेल्या चार महिला अचानक पाण्यात पडल्या. दोन तरुणांनी जीवावर उदार होऊन त्यांचे प्राण वाचविण्याचे काम केल्याचा प्रकार लोणार तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या रायगाव येथे मंगळवार (ता. १५) घडला.


प्राप्त माहितीनुसार, रायगाव येथील श्री समर्थ खडकेश्वर मंदिराच्या पाठीमागे नदी आहे. ही नदी पार करण्यासाठी शेतकऱ्यांना दररोज सकाळ-सायंकाळ ये-जा करावी लागते. मंगळवारी गावातील लक्ष्मी संजय ताठे, अहिल्याबाई महादा नागरे, अरुणा ज्ञानेश्वर नागरे व रुचिता प्रकाश नागरे या चार महिला शेतीच्या कामासाठी मजुरीवर जात होत्या. जाताना येलदरी धरण भरलेले आणि धरणाचे बॅक वॉटर येत असल्याने नदीमध्ये पाणी जास्त होते. नदी पार करत असताना तराफ्यावर सरकत असताना तोल गेला व या चारही महिला नदीत पडल्या. यावेळी गावातील लक्ष्मण विश्वास तिडके व सुमित सुभाष गवळी या दोन युवकांनी पोहून जाऊन या महिलांना बाहेर येण्यासाठी काठापर्यंत आणले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पुलांची मागणी प्रलंबित
गावातील नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना नदीच्या पलीकडे जाण्या-येण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे गावकऱ्यांनीच वर्गणी करून हा ताफा बनवलेला आहे. या ठिकाणी पर्यायी पूल किंवा पर्यायी मार्ग काढावा अशी गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे.

(संपादन - विवेक मेतकर)