esakal | निकष धाब्यावर बसवून निधीचे वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: The work of Dalit Vasti Sudhar Yojana is in doubt

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटक विकास याेजनेअंतर्गत राबविण्यात येमाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेची कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. सर्व नियम धाब्यावर बसून निधी वितरणाचा घोळ घालण्यात आला असल्याचा आरोप शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुराव्यांसह तक्रारीत दिली आहे.

निकष धाब्यावर बसवून निधीचे वितरण

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटक विकास याेजनेअंतर्गत राबविण्यात येमाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेची कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. सर्व नियम धाब्यावर बसून निधी वितरणाचा घोळ घालण्यात आला असल्याचा आरोप शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुराव्यांसह तक्रारीत दिली आहे.


जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे ता. ७ सप्टेंबर राेजी मंजूर कृती आराखड्यानुसार प्रस्तावित करण्यात आली आहे. हा प्रस्तावित कृती आराखडाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शिवसेनेच्या तक्रारीत निधी वाटपातील घोळावर बोट ठेवण्यात आल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटक विकास याेजनेतअंतर्गत कृती आराखड्यात ७० टक्के निरंक वस्त्यांमध्ये कामे मंजूर केलेल्या नाहीत, असे गाेपाल दातकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. लाेकसंख्येचे निकष डावल्यात आले. अनुज्ञेय निधीपेक्षाही जास्त निधी देण्यात आला. त्यामुळे पुर्नतसासणी करून फेरनियाेजन करण्याची मागणी त्यांनी तक्रात केली आहे.

सत्तेतच असमतोल
तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा ६ गट आहे. त्यात जिल्हा परिषद अध्यक्षांचाही गट आहे. या तालुक्याला ९४ लाखाचा निधी दिली. अकाेला तालुक्यातील बाभूळगाव गटाला मात्र २ काेटी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. सत्ताधारी पक्षातील सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या गटातील या असमतोलावरही दातकर यांच्या तक्रारीत उल्लेख आहे.

जिल्ह्यात दलित वस्त्याची स्थिती
पंचायत समिती वस्त्यांची संख्या
अकाेला ४१९
अकाेट २५२
तेल्हारा १७८
बाळापूर २२९
पातूर २४८
बार्शीटाकळी १९१
मूर्तिजापूर ३५०
एकूण १८६७

(संपादन - विवेक मेतकर)