शिक्षकांसाठी शाळा २६ पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 20 June 2020

कोरोना विषाणूमुळे राज्यातील शाळांना मार्च महिन्यापासून सुटी देण्यात आली आहे. परंतु नव्या शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरुवात होत असल्याने आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २६ जूनपासूनच आश्रम शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिले आहेत.

अकोला  ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील शाळांना मार्च महिन्यापासून सुटी देण्यात आली आहे. परंतु नव्या शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरुवात होत असल्याने आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २६ जूनपासूनच आश्रम शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिले आहेत.

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या स्थितीमुळे राज्यातील शाळांसह आश्रम शाळांना २४ मार्चपासून सुट्या देण्यात आल्या आहेत. परंतु जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने या वर्षी त्यावर सुद्धा अनिश्‍चितता आहे. सध्याच्या स्थितीत विद्यार्थ्यांसह शाळा सुरु करणे ही धोरणात्मक बाब असल्याने शासनाने पुढील धोरण निश्‍चित झाल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यास शाळांमधील ऑनलाईन व अन्य शिक्षण तसेच शाळा सुरू होण्यापूर्वीची शिक्षणेत्तर कामे करणे गरजेचे आहे. त्यामुळे अमरावती विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २६ जून पासून शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत नियमितपणे उपस्थित रहावे, असा आदेश शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आश्रम शाळा व निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २६ जून पासूनच काम सुरु करावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Orders for teachers in this school, starting from school 26 for teachers