अकोला : अकोल्यातील पळसो बढे गावात सर्पदंशामुळे १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात गाढ झोपेत असताना विषारी सापाने (Akola Snakebite Death) चावा घेतल्याने ही दुर्घटना घडली. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असून गावात शोककळा पसरली आहे.