अकोल्यात रुग्ण वाढीचा वेग आवरेना; आणखी कोरोनाचा भडका...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

आजपर्यंत एकूण ९९९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ८५७१ आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल १४२१ आहेत.

अकोला : अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. कारण, शनिवारी (ता.२७) तब्बल ५७ रुग्ण आढळले असून, आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या १४२१ झाली आहे. आजअखेर ३०० पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण १००२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९६७०, फेरतपासणीचे १४३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २०८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९९९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ८५७१ आहे. तर पॉझिटिव्ह अहवाल १४२१ आहेत.

आणखी ५७ रुग्णांनी घातली भर
आज दिवसभरात ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातआज सकाळी ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील सहा, अकोटफैल येथील पाच, समर्थनगर पातूर येथील चार, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड येथील दोन तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बोरगावमंजू, अकोट व मंगळूरपीर वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सहा महिला व नऊ पुरुष आहे. त्यातील सात जण हरिहरपेठ येथील, तिघे रजपूत पुरा येथील तर उर्वरित डाबकी रोड, हरिहर मंदिर, खडकी, बाळापूर व मंगळूरपीर (जि.वाशीम) येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

३०० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकूण १४२१ पॉझिटिव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०४७ आहे. तर सद्यस्थितीत ३०० पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोना अपडेट
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१४२१
मृत्यू-७३
आत्महत्या-१
डिस्चार्ज-१०४७
दाखल रुग्ण-३०० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akola, patient growth has not slowed down akola marathi news