esakal | अकोला : सोहळ्याला परवानगी नाकारली; बौद्ध महासभा उच्च न्यायालयात जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

सोहळ्याला परवानगी नाकारली; बौद्ध महासभा उच्च न्यायालयात जाणार

सोहळ्याला परवानगी नाकारली; बौद्ध महासभा उच्च न्यायालयात जाणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने स्थानिक अकोला क्रिकेट क्लबवर प्रत्येक वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात वंचितचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर जनतेला संबोधित करतात. ३५ वर्ष जुन्या हा सोहळा यंदा १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सोहळ्याला यंदा जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्याविरोधात भारतीय बौद्ध महासभा नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे यांनी गुरुवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन माेठ्या उत्साहात साजरा करण्यात येताे. या दिवसाच्या दूसऱ्या दिवशी शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येते. त्यात ग्रामीण व शहरी भागातील उपासक, उपासिकांसह इतर जिल्ह्यातील नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेतात. यावेळी शहरातून भव्य रॅली काढण्यात येते. रॅलीत ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर सहभागी होतात. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त आहे. गत वर्षी कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव लक्षात घेता ही सभा ऑनलाईन घेण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून जनजीवन सामान्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी ही प्रबोधन सभा आयोजित होईल याचा प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. दरम्यान सभेच्या परवानगीसाठी आयोजकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे रितसर विनंती अर्ज सादर केला होता. परंतु जिल्हाधिकारी यांनी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सोहळ्याला परवानगी देता येणार नाही, असे कळवून सभेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे याविरोधात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेत आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे, प्रभा शिरसाट, अरुंधती शिरसाट, दिनकर खंडारे व प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे यांची उपस्थिती होती.

loading image
go to top