दूरसंचार राज्यमंत्री असतानाच अनेकांचे फोन आऊट ऑफ कव्हरेज

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दर्जाहिन सेवांचा फटका सोमवारी अकोलेकरांना बसला. दिवसभर अनेकांचे फोन आऊट ऑफ कव्हरेज होते. विशेष म्हणजे, केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे अनेक दिवसांनंतर अकोल्यात आले असतानाच नेटवर्क गायब झाल्याने यामागील नेमके कारण काय याची ‘आयडीया’ कुणालाही नव्हती

अकोला ः खासगी दूरसंचार कंपन्यांच्या दर्जाहिन सेवांचा फटका सोमवारी अकोलेकरांना बसला. दिवसभर अनेकांचे फोन आऊट ऑफ कव्हरेज होते. विशेष म्हणजे, केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे अनेक दिवसांनंतर अकोल्यात आले असतानाच नेटवर्क गायब झाल्याने यामागील नेमके कारण काय याची ‘आयडीया’ कुणालाही नव्हती.

कॉल ड्रॉपच्या त्रासमुळे अनेक दिवसांपासून अकोलेकर त्रस्त आहेत. त्यातच गेले काही दिवसांपासून मोबाईल नेटवर्कच्या त्रासही सहन करावा लागत आहे. खासगी मोबाईल कंपन्यांच्या केबलबाबत मनपाने कारवाई सुरू केल्यानंतर अनेक दिवस शहरातील खासगी कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क गायब होते. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात नेटवर्क हळूहळू रुळावर आले असतानाच कॉल ड्रॉपचा त्रास सुरू झाला. आता तर कॉलच लागत नाही आणि लागला तर समोरच्याचा आवाजही येत नसल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.

अकोला  जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सोमवारी तर आयडीया-व्होडाफोन कंपनीचे नेटवर्कच दिवसभर जाम झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही समस्या कायम होती. जीओचेही नेटवर्क काही भागात मिळत नसल्याच्या तक्रारीही ग्राहकांनी केल्यात. विशेष म्हणजे, केंद्रीय दूरसंंचारमंत्री संजय धोत्रे हे अनेक दिवसांनंतर अकोल्यात परतले. ते शहरात असतानाच नेटवर्क जामचा त्रास सुरू झाला. याबाबत खासगी कंपन्यांंकडे तक्रारी केल्या असता लवकरच समस्या सोडविली जाईल, असे उत्तर देण्यात आले.

नेहमीचाच त्रास
अकोला शहरात खासगी मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्क जामचा त्रास हा नेहमीचाच झाला आहे. नेटवर्क न मिळणे, कॉल ट्रॉप यासारख्या तक्रारीत वाढतच आहे. विशेषतः आयडीया आणि व्होटाफोनच्या ग्राहकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलच्या नेटवर्कबाबतही ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Phone out of coverage of many while he was the Minister of State for Telecommunications