अकोला : ठाणेदारासह पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणारे आरोपी निर्दोष

तत्कालीन ठाणेदार दीप बुधवंत व अनिल कायंदे हे रात्री २ वाजता शेख जुबेरच्या घरी गेले असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
court
courtsakal

अकोला : उरळ पोलिस स्टेशनचे (Ural Police Station) तत्कालीन ठाणेदार दीपक बुधवंत व जमादार अनिल कायंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपातून (District and Session Court) निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी न्यायालयीन सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार ६ डिसेंबर २००९ रोजी पोलिस स्टेशन उरळ येथे आरोपी शेख जुनेद, शेख जुबेर, शेख जावेद, शेख उबेद आणि ताज बी शेख मुखतर यांचे विरुध्द कलम १४७, १४८, १४९, ३५३, ३०७, ३३३, ३३२, १८६, ५०६ प्रमाणे हेड कॉस्टेबल फिर्यादी अनिल कायंदे उरळ यांचे फिर्यादीवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

फिर्यादमध्ये असे नमुद करण्यात आले होते की, ५ डिसेंबर २००९ रोजी जमादार अनिल कायंदे हातरुन पोलिस चौकी मध्ये तैनात असताना डॉ. रोकडे यांनी त्यांना माहिती दिली की, त्यांच्या दवाखान्यामध्ये फ्रिज आणि ५०० रुपये चोरी करण्यात आले आहे आणि या चोरीचा संशय आरोपी शेख जुबेर यांचेवर दाखवला होता.

महात्मा गांधीच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी देश सोडला : कोश्यारी

त्यामुळे तत्कालीन ठाणेदार दीप बुधवंत व अनिल कायंदे हे रात्री २ वाजता शेख जुबेरच्या घरी गेले असता आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी आरोपी विरुध्द पोलिस उपविभागिय अधिकारी कुंमरे यांनी तपास करुन वरील गुन्ह्याप्रमाणे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. सदर प्रकरणात न्यायालयात १३ साक्षिदार तपासण्यात आले. सर्व पडताळणी झाल्यानंतर न्यायलयाने २९ डिसेंबर रोजी आरोपींची आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com