
अकोला : शहरातील खदान पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये खदान पोलिसांनी मोठी कामगिरी करत दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून तब्बल ११ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, या प्रकरणात १४.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.